शालेय पोषण आहार वाटपात अनियमितता , चौकशी समिती एक फार्स ठरण्याची भिती?
शांताराम दराडे
समशेरपूर प्रतिनिधी
शालेय पोषण आहाराच्या वाटपात झालेल्या अनियमितपणा (भ्रष्टाचाराची) ची चौकशी करण्यासाठी अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांचे आदेशाने जानेवारी २०२२ मध्ये जिल्हा तसेच तालुका स्तरावर शालेय पोषण आहारात झालेल्या अनियमितपणा तपासण्यासाठी समिती नेमण्याचा आदेश काढण्यात आला त्याप्रमाणे जिल्हा स्तरावर तसेच तालुका स्तरावर विविध समित्या नेमण्यात आल्या
अकोले तालुक्यात सुद्धा तालुकास्तरावर शालेय पोषण आहाराच्या वाटपात झालेल्या अनियमितपणा तपासण्या साठी समिती नेमण्यात आली होती
दिनांक 23 फेब्रुवारी २०२२रोजी ही समिती समशेरपुर येथे आली होती या समितीने एका नामांकित संस्थेच्या शाळेत शालेय पोषण आहारात मागील काही वर्षात झालेल्या अनियमितपणाच्या चौकशी साठी आली होती कि दुसरी काही चौकशी होती ?असा प्रश्न पालकांना पडला आहे याचे कारण असे की सदर समिती समशेरपुर येथे तपासनीसाठी येणार याची पुसटशी कल्पना पालकांना देण्यात आली नाही मग शिक्षकांनी काही ठराविक त्यांच्या मर्जीतील पालकांनाच शाळेत बोलावुन चौकशी पुर्ण केली का? समितीने काय तपासनी केली हे पालकांना कळणार कि नुसते कागदी घोडे नाचवणार याची पालक वर्गात चर्चा आहे
अहमदनगर जिल्ह्यातील एका नामांकित संस्थेची ही शाळा असून 2019 पासून अनेक वेळा संस्थेच्या शाळेत शालेय पोषण आहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत होता या शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनीसुद्धा कोवीड च्या अगोदर साधारणपणे २०१९ साली शालेय शिक्षण विभागाकडे अर्ज करून शालेय पोषण आहार वाटपात भ्रष्टाचार झाल्याने चौकशी करण्याची विनंती केली होती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अकोले तालुकास्तराीय अधिकारी यांनी सदर शाळेत जाऊन संस्थेच्या शाळेत झालेल्या शालेय पोषण आहार वाटपाची तपासणी केली सदर शालेय व्यवस्थापन अध्यक्षांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता दुस-या खोलीत बसवुन ठेवुन चौकशी गुंडाळण्यात आली याचे बक्षीस म्हणुन काही दिवसांनी समशेरपुर येथे झालेल्या तालूकास्तरीय शिक्षण विभागाच्या भव्य दिव्य कार्यक्रमाचा जेवणासकट संपुर्ण आयोजनाचा खर्च सदर शाळेच्या त्यावेळच्या भ्रष्टाचार केलेल्या प्राचार्य/ मुख्यध्यापकाने केला होता
परंतु शिक्षण विभागाकडे तक्रार केलेल्या त्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाला कुठल्याही प्रकारचं विश्वासात न घेता आणि भ्रष्टाचार झाल की नाही याची कुठलीही कल्पना न देता चौकशी गुंडाळण्यात आली अशाप्रकारे 2019 पासून आणि त्याच्यानंतर सुद्धा शालेय पोषण आहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अनेक पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी सदर संस्थेच्या शाळेवर व शाळेच्या प्रशासनावर केला आहे
समशेरपुर येथील सदर संस्थेच्या या शाळेत समशेरपुर तसेच परिसरातील घोडसरवाडी , नागवाडी तसेच दुर्गम भागात असलेल्या मुथाळणे, कानडवाडी, नायकरवाडी येथील विद्यार्थी तसेच आदिवासी भागातील घाटा खालची वाडी देवाची वाडी चिंचाची वाडी फोडसेवाडी ,बिबदरावाडी,याठिकाणचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत सदर विद्यार्थी लांबच्या अंतरावरुन शाळेत येतात या विद्यार्थ्यांना खरोखर शालेय पोषण आहार मिळाला कि नाही याची खरी चौकशी करण्याची गरज आहे मागील काही दिवसांपुर्वी आॅन कॅमेरा सदर शाळेचे विद्यार्थी तसेच पालकांनी २०२०ते २०२१ कोरोना संक्रमण काळात शालेय पोषण आहारातील अनियमितपणाबाबत तक्रारी केल्या होत्या सदर विद्यार्थ्यांना चार पैकी फक्त एकदाच तांदुळ तसेच थोडीफार डाळ देण्यात आली अस त्यांच म्हणन आहे परंतु हे जेव्हा सदर शाळेतील प्रशासनास कळले तेंव्हा त्यांनी त्यातील पालकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तसेच जे शाळेचे पदाधिकारी होते त्यांना हाताशी धरुन त्यांना काही जास्तीचे सामान देऊन त्यांना खुष करण्यात आले गोरगरीब विद्यार्थ्यांचे आहारात भ्रष्टाचार करण्यात आला अस काही पालकांच मत आहे तस बघितल तर शंभर टक्के पोषण आहार फक्त कागदोपत्री वाटप केल्याच दाखवल जातं परंतु सर्व विद्यार्थी सदर पोषण आहार खातात का? हा खरा प्रश्न आहे मग जर त्यातील काही मुले आहार खात नसतील तर उरलेल्या आहाराची कोण वाट लावत ?आणि हा आहार तांदुळ,तेल,मसाले,डाळ,हे सर्व पोषण आहारातील साहित्य जात कुठ याची चौकशी करणे गरजेचे आहे येथेच शालेय पोषण आहार लाकडांवर शिजवला जात होता मग सरकार जर गॅस साठी पैसे देत असेल तर ते कोणाच्या खिशात जात होते यांनी जंगल तोड केली असेल तर ती पर्यावरणाची हानीच मानली पाहीजे आणि गॅसचे पैसे सरकारकडून उकळले असेल तर कारवाई होणे गरजेचे आहे .दुसरे सर्वात महत्वाचे म्हणजे सध्या शालेय पोषण आहार भ्रष्टाचार करण्याचा सर्वात सोपा मार्ग शोधल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे ती अशी की रोज शाळेतील एकुण किति मूले आहार खातात आणि त्यासाठी कीती आहार जसे की मसाले,तांदुळ तेल डाळी लागतात याचा हिशोब करायचा त्याचे सरासरी प्रमाण काढुन तेवढाच माल शालेय पोषणआहार वाहतुक करणा-या गाडीतुन उतरवुन घ्यायचा आणि उरलेला माल शालेय पोषणआहार वाहतुक करणा-या त्या ठेकेदारास तिथेच विकुन टाकायचा असा भ्रष्टाचाराचा नवीन मार्ग शोधला आहे यात धोका कमी असुन पोषण आहार वाहतुक करणारी गाडी असल्यामुळे त्याची कोण तपासनी करणार? कारण सदर गाडीत परीसरातील अनेक शाळांचा पोषण आहार असतो असा प्रकार इथे होत होता परंतु भितीने याची माहिती सांगण्यास कुणी पुढे येत नाही याच कारण अस की सध्या ह्या संस्था च्या तसेच इतरहि शाळांमध्ये स्थानिक शिक्षक ,कर्मचारी असलेने कुणी काही तक्रार केली की सदर शिक्षक कर्मचारी सदर पालकांवर दबाव आणतात मग गावचा प्रश्न,मुलांच्या शिक्षणात काही आडकाठी होऊ नये या भितीने पालक तक्रार करण्यासाठी सहसा पुढे येत नाहीत आणि अजुन एक गोष्ट समोर येत आहे ति म्हणजे शाळेत पाचवी ते आठवी पर्यंत साधारणपणे पाचशे विद्यार्थी असतील आणि त्यातील फक्त दोनशेच विद्यार्थी रोजच्यारोज शालेय पोषण आहार खात असतील तर सरासरी त्याच प्रमाणात रोज आहार शिजवला जाऊन उरलेल्या मालाची पध्दतशिर विल्हेवाट लावली जाते । या सर्व गोष्टींचा विचार करुन चौकशी केली जाणार आहे का?आणि दोषींवर कारवाई झाली तरच प्रशासनाविषयीची जनतेची विश्वासार्हता वाढेल. लांब अंतरावरुन येणा-या किती विद्यार्थ्यांच्या पालकांना चौकशी समिती समोर चौकशीसाठी बोलावणे झाले?याची चौकशी करणे गरजेचे आहे तसेच कुणाला काही लेखी अर्ज देऊन तक्रार करायची इच्छा असेल तर दोन दिवस अगोदरच पालकांना याची माहीती देणे गरजेचे होते नाहितर हि चौकशी म्हणजे एक फार्स ठरु नये अशीच तमाम पालकांची इच्छा आहे