प्रोजेक्ट ख़ुशी उपक्रमाने ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना – पद्मश्री राहीबाई पोपेरे

अकोले /प्रतिनिधी
इंडोफील कंपनीच्या प्रोजेक्ट खुशी उपक्रमाने ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना मिळेल त्यामुळे इंडोफिल कंपनीचे उपक्रम समाजातील तळागाळांच्या घटकांपर्यंत पोहोचले पाहिजे असे प्रतिपादन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केले
अकोले तालुक्यातील कळस येथील कळसेश्वर विद्यालयात प्रोजेक्ट ख़ुशी या उपक्रमाच्या शुभारंभ करण्यात आला , कळस चे सरपंच राजेंद्र गवांदे ,कृषी उद्योजक अनिल नवले, बाएफचे जतीन साठे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब वाकचौरे, मुख्याध्यापिका संगीता दिघे या सह मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पद्मश्री राहीबाई पोपेरे म्हणाल्या की प्रोजेक्ट ख़ुशी हा इंडोफिल कंपनीचा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार असून या शिष्यवृत्तीने मुलींच्या शिक्षणाला चालना मिळेल. काळ्या आईकडून मिळालेली शिकवण हीच मला आयुष्यात मोठे करून दिले. समाजातील मोठ्या दानशूर संस्था आणि प्रतिनिधींनी मुलींच्या शिक्षणाला मदत करावी. मुलांनीही आई-वडिलांनी केलेल्या श्रमाची जाण ठेवून उच्च शिक्षित झाले तरी आपले गाव आणि आपली माती यांची यांच्याशी नाळ तोडू नये, प्रत्येक महिला शिकल्यास देशाची प्रगती होईल व त्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे असल्याचे पोपेरे यांनी सांगितले.

यावेळी इंडोफिल कंपनीच्या सी एस आर फंडातून कळसेश्वर विद्यालयातील मुलींना शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले .इंडोफील चे जनरल मॅनेजर महेश कुमार खंबेटे, क्लस्टर हेड जगदीश येरनानी, कम्युनिकेशन मॅनेजर नम्रता वर्तक, रिजनल मॅनेजर सागर पगार, टेरिटरी मॅनेजर राजेश जाधव यांनी कार्यक्रम यशस्वी ते साठी परिश्रम घेतले .या वेळी शिक्षक पालक शेतकरी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.