आजचे पंचांग व राशी भविष्य दि ०१/०३/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन १० शके १९४३
दिनांक :- ०१/०३/२०२२,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:४८,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३४,
शक :- १९४३
संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋत
मास :- माघ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- चतुर्दशी समाप्ति २५:०१,
नक्षत्र :- धनिष्ठा समाप्ति २७:४८,
योग :- परिघ समाप्ति ११:१७,
करण :- विष्टि समाप्ति १४:०७,
चंद्र राशि :- मकर,(१६:३१नं. कुंभ),
रविराशि – नक्षत्र :- कुंभ – शततारका,
गुरुराशि :- कुंभ,
शुक्रराशि :- मकर,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०३:३८ ते ०५:६६ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ११:१४ ते १२:४२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:४२ ते ०२:१० पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:३८ ते ०५:०६ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
महाशिवरात्रीला, शिवपूजन(मध्यरात्री २४:२६ ते २५:१५), भद्रा १४:०७ प., मृत्यु २७:४८ नं.,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन १० शके १९४३
दिनांक = ०१/०३/२०२२
वार = भौमवासरे(मंगळवार)
मेष
प्रेमभावना वाढीस लागेल. भागिदारीतून चांगला लाभ संभवतो. व्यापार विस्ताराचा विचार कराल. आपले महत्व इतरांना पटवून द्याल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.”
वृषभ
मनातील आकांक्षा पूर्ण होतील. स्त्रीवर्गाशी मैत्री कराल. तुमच्यातील शालीनता दिसून येईल. चारचौघात तुमचे कौतुक होईल. आर्थिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल.
मिथुन
औद्योगिक वातावरण चांगले राहील. बोलण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल. सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. सहृदयतेने वागणे ठेवाल. मित्रांच्या ओळखीने कामे केली जातील.
कर्क
मनाची विशालता दाखवाल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. कलेला पोषक वातावरण मिळेल. मुलांकडून आनंदाच्या बातम्या मिळतील. वाचनाची आवड जोपासाल.
सिंह
जवळच्या सहलीचा आनंद घ्याल. मित्रमंडळी जमवाल. रेस, सट्टा यांतून लाभ होईल. सासुरवाडीची मदत मिळेल. काही कामे कमी श्रमात पार पडतील.
कन्या
उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. आवडी-निवडी वर भर द्याल. एकमेकांची बाजू उत्तमरीत्या समजून घ्याल. पत्नीच्या शांत स्वभावाची जाणीव होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.
तूळ
लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. आळशीपणा करू नका. हाताखालील नोकरांचे सहकार्य लाभेल. ऐषारामाच्या गोष्टींची आवड निर्माण होईल. व्यसनाच्या आहारी जाऊ नका.
वृश्चिक
मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. मित्र परिवारात भर पडेल. आधुनिक विचार मांडाल. हातून चांगले लिखाण होईल. मनमोकळ्या गप्पा मारता येतील.
धनू
मानसिक समाधान लाभेल. मदत करण्याचा आनंद कमवाल. घरात टापटीपपणा ठेवाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल.
मकर
भावंडांचे उत्तम सौख्य लाभेल. प्रवासाची हौस पूर्ण करता येईल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल. निसर्गाच्या सहवासात रमून जाल.
कुंभ
कामाचा व्याप वाढू शकतो. गप्पा-गोष्टींमध्ये वेळ जाईल. आवडत्या वस्तु खरेदी कराल. एकलकोंडेपणा बाजूला ठेवावा. गुरूजनांचा सहवास लाभेल.
मीन
मानसिक चंचलता जाणवेल. अचानक धनलाभ संभवतो. सर्वांशी आपलेपणाने वागाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. चैनीकडे कल राहील.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर