शिरपुंजे येथील भैरवगड विदयार्थ्यांनी केला प्लास्टिक मुक्त.

अकोले/प्रतिनिधी-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व अॅड्.एम.एन. देशमुख महाविद्यालयाच्या विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराच्या निमित्ताने शिरपुंजे या ठिकाणी असलेले अखिल आदिवासी समाजाचे कुलदैवत भैरवगड येथे 150 स्वयंसेवकांनी संपूर्ण पायथा ते मंदिरापर्यंतचा परिसर सर्वत्र स्वच्छता अभियान राबवून भैरवगड प्लास्टिक मुक्त व कचरामुक्त केला
यावेळी गडावर जाणारा कच्चा रस्ता, दगड गोटे व माती टाकून दुरुस्त करण्यात आला. गडावर रिकाम्या पाण्याच्या बाटल्या व इतर प्लास्टिक सदृश्य वस्तू गोळा करून जवळजवळ 14 गोण्या कचरा गोळा करून तो खड्ड्यात बुजून टाकण्यात आला.
यावेळी प्रा. डॉ. काकडे एल.बी. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक बी.के.थोरात
यांनी भैरवगड या गडाची ऐतिहासिक माहिती तसेच पर्यावरणीय दृष्ट्या निसर्गाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे हे स्पष्ट करून सांगितले.
यावेळी स्वच्छते मोहिमेसाठी प्रा. तेलोरे बी.एच.,प्रा. देशमुख,उबाळे के. सी.यांचे विषेश सहकार्य लाभले.
————-/–—-