स्वयंभू काळेश्वर देवस्थानच्या विकासासाठी कटिबध्द – चंद्रशेखर घुले

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
जिल्हा परिषेदेतील मिळलेल्या पदा मुळेच आपण तालुक्यातील इतर देवस्थानाला निधी उपलब्ध करून देऊन आनेक विकास कामे करता आले. या पदाच्या माध्यमातुन देवस्थान व परिसरातील रस्ते व अन्य विकासकामे करता आले याचे समाधान वाटते. भविष्यातही आपण देवस्थानच्या विकास कामात कटिबध्द असल्याचे मत माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी व्यक्त केले.
शेवगाव -नेवासा राजमार्गावरील भातकुडगाव फाट्यापासुन काही अंतरावर याच राजमार्गावरील गुंफा येथील स्वयंभू काळेश्वर भगवानची महाशिवरात्री निमित्त माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील व जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले यांच्या हस्ते महापुजा व आरती करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी ह.भ.प. प्रभाकर महाराज कावले, लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सखाराम लव्हाळे, पंडीतराव भोसले, कामधेनुचे पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे, भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर, विदयमान सरपंच अशोक वाघमोडे विठ्ठल फटांगरे, राजेश फटांगरे,खरेदी विक्री संघाचे संचालक बाळासाहेब जाधव, भगवान आढाव, युवा नेते विठ्ठल आढाव, आर.आर.घुमरे, अशोक मेरड, ज्ञानदेव खरड, राजेंद्र लोमटे, बापुसाहेब कुटे, शेषेराव दुकळे, अॅड.सागर चव्हाण, संजय आहेर, गोरक्षनाथ भेंडेकर, विजय काळे, अभिजीत पानसंबळ, सचिन फटांगरे, श्रीराम भेंडेकर, विजय नजन, जालींदर नजन, बाबा साबळे, नानासाहेब काळे, भारत चोपडे, शेलेश नारळकर कार्यक्रमाचे प्रस्ताविक बाळासाहेब काळे यांनी केले तर आभार रविंद्र काळे मानले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड.सागर चव्हाण यांनी केले.
– माजी आमदार चंद्रशेखर घुले व जिल्हा परिषेदेच्या अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले यांनी स्वयंभू काळेशवरांचा अभिषेक करून परंपरा कायम ठेवली. लोकनेते मारूतराव घुले पाटिल यांचीही या देवास्थानवर नितांत श्रध्दां होती. गुंफा या ठिकाणी देवस्थानापुर्वी ते काळेगाव या ठिकाणी होते. घुले कटुंबिय नेहमी काळेगावी जाऊन मनोभावे सेवा करत होते. तीच परपरां आज जपत आज महापुजा करून अभिषेक केला.
——-