नेवासा तालुक्यातील चांदा येथे कर्डिले वस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ !

.दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील चांदा येथील कर्डिले वस्तीवर महाशिवरात्रीच्या मध्यरात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला
.वस्तीवरील लोकांना मारहाण करत ऐवज चोरून नेला चोरट्यांशी झालेल्या झटापटीत कर्डिले वस्ती वरील ओंकार गंगाधर कर्डिले हा युवक मयत झाला असून दोन जण गंभीर जखमी
असल्याचे समजले आहे . इतर दोघांनाही मोठ्या दुखापती झाल्याआहेत. सदर सर्व जखमींना गावातील डॉ सुधाकर निकाळजे यांच्या हॉस्पीटलमध्ये दाखल केले तेथे प्राथमिक उपचार करून सर्वांना नगर येथील दवाखान्यात हलविण्यात आले आहे .
चांदा लोहारवाडी रोडवरील कर्डिले वस्ती या ठिकाणी काल महाशिवरात्रीच्या रात्री साधारण 12 ते 1 च्या दरम्यान चोरट्यांनी बापू भाऊसाहेब कर्डिले यांच्या वस्तीवर प्रवेश केला त्यांच्या सौभाग्यवती अर्चनाताई कर्डिले व आई नर्मदा कर्डिले यांना दहशत दाखवत त्यांच्या गळ्यातील
सोन्याचे दागिने पळवून नेले यावेळी बापू कर्डिले त्यांचे चुलते गंगाधर नामदेव कर्डिले सुभाष नामदेव कर्डिले आदी सर्व जण कर्डिले
वस्तीवरील लोक जागे होऊन त्यांच्या पाठीमागे पळाली शेजारीच कांद्याच्या शेतात त्यांनी एकाला पकडले मात्र पाठीमागून अंधारात
लपून बसलेल्या दुसऱ्याने पळत येऊन त्यातील तिघांवर धारदार शस्त्राने वार करून त्यांना गंभीर जखमी केले आपली लोक जखमी झाल्याचे पाहून कर्डिले वस्ती वरील लोकांनी चोरट्याला सोडुन दिले जखमींना तातडीने दवाखान्यात नेण्यासाठी प्रयत्न केला मात्र तोपर्यंत चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले घटनेची खबर समजताच
सोनई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन बागुल फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले
पहाटे तीन वाजेच्या दरम्यान श्वान पथकही आले सकाळी 9 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक
मनोज पाटिल यांनी घटनास्थळी भेट दिली असून चोरीचा तपास लवकर लावला जाईल असे त्यांनी सांगितले.
दरोड्यात गंभीर जखमी झालेल्या ओंकार गंगाधर कर्डिले वय २१या युवकाचे नगर येथील दवाखान्यात उपचारा दरम्यान निधन झाले आहे
त्याच्या निधनाच वृत्त समजताच चांदा आणि परीसरात शोककळा पसरली आहे . गावातील व्यापा ऱ्यांनी गाव बंद ठेवुन श्रध्दांजली
वाहिली . मुळा एज्युकेशन सोसायटीचे शिक्षक गंगाधर नामदेव कर्डीले यांचा ओंकार हा मुलगा होता कालच्या घटनेत श्री कर्डिले हे सुद्धा जखमी झाले असून त्याच्यावर नगर येथील दवाखान्यात
उपचार सुरू आहेत ओंकार कर्डिले यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर चांदा येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात
आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. सदर घटनेची माहिती नामदार शंकरराव गडाख यांना समजताच त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून आवश्यक त्या सूचना
दिल्या तसेच नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख यांनी कर्डिले कुटुंबीयांची भेट घेतली
—///—–.