राशिभविष्य

आजचे पंचांग व राशिभविष्य दि ०३/०३/२०२२


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन १२ शके १९४३
दिनांक :- ०३/०३/२०२२,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:४८,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३४,
शक :- १९४३
संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- फाल्गुन
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- प्रतिपदा समाप्ति २१:३७,
नक्षत्र :- पूर्वाभाद्रपदा समाप्ति २५:५६,
योग :- साध्य समाप्ति २७:२८,
करण :- किंस्तुघ्न समाप्ति १०:१७,
चंद्र राशि :- कुंभ,(२०:०३नं. मीन),
रविराशि – नक्षत्र :- कुंभ – शततारका,
गुरुराशि :- कुंभ,
शुक्रराशि :- मकर,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०२:१० ते ०३:३८ पर्यंत,

लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०६:४८ ते ०८:१६ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:४१ ते ०२:१० पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०२:१० ते ०३:३८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०५:०६ ते ०६:३४ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
इष्टि,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन १२ शके १९४३
दिनांक = ०३/०३/२०२२
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)

मेष
शेअर्सच्या व्यवहारातून लाभ संभवतो. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. स्वत:च्या इच्छा स्वत:च पूर्ण कराल. नवीन मित्र जोडाल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल.

वृषभ
उत्तम व्यावसायिक लाभ होईल. बँकेची कामे सुरळीत पार पडतील. कामात वडीलांची मदत होईल. आर्थिक कामात अधिक वेळ जाईल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.

मिथुन
वडीलधार्‍यांचा योग्य मान राखाल. दूरच्या प्रवासाचा योग येईल. हातातील कामात यश येईल. तुमच्यातील सज्जनपणा दिसून येईल. जवळचे नातेवाईक भेटतील.

कर्क
आरोग्याची काळजी घ्यावी. थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. जोडीदाराच्या शांत स्वभावाचे कौतुक कराल. मुलांच्या आनंदात रमून जाल.

सिंह
घरातील कामात व्यग्र राहाल. मुलांचा धीटपणा वाढेल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. वारसा हक्काच्या कामातून लाभ संभवतो. कौटुंबिक वातावरण समाधानाचे असेल.

कन्या
जवळचा प्रवास हसत-खेळत होईल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी जाणवतील. कौटुंबिक समस्या हिंमतीने सोडवाल. एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.

तुळ
आवडते पदार्थ खायला मिळतील. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. प्रवासात काही अडचणी जाणवतील. मुलांचे वागणे  विरोधी वाटू शकते. उगाच चिडचिड करू नका.

वृश्चिक
आवडीच्या कामांमध्ये व्यग्र राहाल. कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. खर्चाला वाटा फुटतील. बोलताना भान राखावे. वस्तूंची आवश्यकता लक्षात घेऊन खर्च करावा.

धनू
कामातील उत्साह वाढेल. उतावीळपणे निर्णय घेऊ नका. पारंपरिक कामात लक्ष घालावे लागेल. नवीन संधींसाठी काही वेळ द्यावा लागेल. मध्यस्थी कामात फायदा  संभवतो.

मकर
गोष्टींची अनुकूलता समजून घ्यावी. निराशेला बळी पडू नका. जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. कामात स्त्री वर्गाचा हातभार लाभेल. धार्मिक कामांत अधिकार वाणीने वावराल.

कुंभ
श्रम अधिक वाढू  शकतात. बौद्धिक थकवा जाणवू शकतो. अतिविचार करणे टाळावे. व्यावसायिक ठिकाणी अनुकूलता लाभेल. सर्वांशी गोड बोलाल.

मीन
इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. परोपकाराची जाणीव ठेवाल. कामातील बदलांची कुणकुण लागेल. आवडते छंद  जोपासावेत. मदतीचा हात पुढे कराल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button