रोटरी क्लब ऑफ नासिक व नाशिक महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिओ लसीकरण!

नाशिक प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नासिक व नाशिक महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रु २०२२ रोजी रोटरी हॉल गंजमाळ येथे भारत सरकार द्वारे राबविण्यात येत असलेल्या पोलिओ मुक्तता अभियान योजने अंतर्गत पोलिओ डोस शिबीर आयोजित केले होते , यामध्ये पाच वर्षां आतील एकूण १२६ मुलामुलींना पोलिओचे डोस देण्यात आले
, या शिबीरासाठी रोटरी क्लब ऑफ नासिक सातत्याने पुढाकार घेऊन आपले सामाजिक दायित्व जपत आहे. शिबिरास रोटरी क्लब ऑफ नासिकच्या अध्यक्षा डॉ श्रीया कुलकर्णी , माजी अध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल , माजी अध्यक्ष अनिल सूकेणकर उपस्थित होते , रोटे. करण रौंदळ यांनी त्यांच्या मूलास पोलिओचा डोस देत आदर्श पालकांच एक कर्तव्य पूर्ण केले , नाशिक महानगरपालिकेच्या सौ.वंदना योगेश जाधव व सौ. जयश्री संजय सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.