येरवडा येथील बांधकाम साईटवर झालेल्या अपघाताची चौकशी करून मृत कामगारांच्या वारसांना भरपाई द्या

पुणे प्रतिनिधी
येरवडा पुणे येथील बांधकाम साईटवर झालेल्या अपघाताची सखोल चौकशी करून मृत कामगारांच्या वारसांना नुकसान भरपाई द्या. भारतीय मजदूर संघाची मागणी केली आहे
दि. 3 फेब्रुवारी 2022 रोजी पुणे नगर रस्ता येरवडा येथे बेसमेंट चे काम चालू असताना, अचानकपणे लोखंडी वजनदार स्लँब ची जाळी कोसळून सात कामगारांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला व अनेक कामगार जखमी झाले आहेत.
यात मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना नुकसान भरपाई व बांधकाम कामगारांना न्याय देण्याचा हेतूने भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा चे शिष्टमंडळाने कामगार उपायुक्त श्री अभय गीते यांच्या शी चर्चा करून कामगारांना , त्यांच्या वारसांना कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली.
1) अपघाताची सखोल चौकशी, करून दोषी कंपनी व ठेकेदाराचे परवाने रद्द करण्यात यावेत. 2) या चौकशी मध्ये संघटनेचे प्रतिनिधीना सहभागी करून घ्यावे.
3) अपघातात मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना नुकसान भरपाई म्हणून रू 50 लाख व शासनाच्या किमान वेतनाच्या किमान 50% रक्कम प्रति माहे पेंशन म्हणून देण्यात यावी, जखमी कामगारांना चांगले उपचार करण्यात यावेत. व 25 लाख रू आर्थिक मदत द्यावी.
4) चौकशी अहवाल त्वरित सादर करून अपघात टाळण्यासाठी प्रमाणीत पध्दत निश्चीत करण्यात यावी. व त्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी.
अशी मागणी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा च्या वतीने करण्यात आली आहे
. या वेळी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण व बांधकाम कामगार संघांचे पदाधिकारी श्री उमेश विस्वाद उपस्थित होते.
या बाबतीत शासनाने, बांधकाम कंपनी ने कामगारांना न्याय न दिल्यास भारतीय मजदूर संघ तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण व उमेश विस्वाद यांनी दिला आहे