आदिवासी समाजाने निसर्गवादी बनायला हवे – श्री. राजेंद्र भवारी

राजूर प्रतिनिधी
” आदिवासी समाज हा साधा, भोळा, कष्टा बाबत प्रामाणिक असलेला दिसून येतो कारण तो समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेला आहे. त्यांच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करतांना दिसते. आदिवासी विकास आणि आदिवासी संस्कृतीचा अभ्यास होईल. आदिवासींच्या त्यागातून, शौर्यातून त्यांना घटनात्मक संरक्षण देण्यात आले आहे. असे प्रतिपादन राजूर प्रकल्पा चे . प्रकल्प अधिकारी राजेंद्र भवारी यांनी केले.

आदिवासी संस्कृती कार्यशाळा शिबिरात उद्घाटनपर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी .मिलिंद उमराणी हे उपस्थीत होते.
ते म्हणाले की आदिवासी अनुसूचित विभागात, पेसा कायदा, वनहक्क कायदा राबविला गेला पाहिजे. म्हणजे गावातील स्वयंशासन, वाडी, वस्ती, जमीन विकास, शिक्षण असे विविध प्रश्न सोडवता येतील.” यावेळी प्रमूख मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यशाळा प्रसंगी आदिवासी समाजातील विविध हस्तकला, आदिवासी साहित्य, वारली चित्रकला यांचे प्रदर्शन भरविण्यात आहे होते. आपल्या प्रास्ताविक भाषणात प्राचार्य डॉ.भाऊसाहेब देशमुख यांनी शिबीर आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.” आदिवासी संस्कृतीचे जतन होणे काळाची गरज आहे. शासकीय योजनाचा जास्तीत जास्त लाभ आद”असे विचार यावेळी त्यांनी मांडले. या शिबिरात महाविद्यालयातील एकुण १०० विद्यार्थी सहभागी झाले होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात मिलिंद उमराणी म्हणाले की,”आदिवासी समाजाच्या संस्कृतीवर बरेच संशोधन झाले आहे. आदिवासी हे शरीराने काटक आणि कष्ट करणारे आहेत. तसेच आदिवासी समाजासाठी कार्य करणारे अनेक नेते तयार झाले आहे. आदिवासी समाज हा इतर बाह्य संस्कृती बरोबर मिळून-मिसळून राहतो तरी आजही आदिवासी समाजाने आपली ओळख, संस्कृती ठिकवून ठेवली आहे “
या शिबिरात दुपारच्या सत्रात गायकवाड यांनी ” निसर्गाने दिलेले आयुष्य आनंदाने जगा ! आदिवासी हाच खरा जीवनाचा जगण्याचा अर्थ सांगतो कधीही स्त्री-पुरुष समानता आदि आदिवासी समाजात संचय करण्यास फार महत्व नाही, त्यांच्या गरजा आतिशय मर्यादित आहेत.”असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या शिबिरात दुपारच्या सत्रात डॉ.एल.बी.काकडे यांनी इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. आदिवासी समाज आधुनिकतेकडे वाटचाल करत असला तरी आदिवासी समाजाचा इतिहास हा कधी नष्ट होणार नाही. तसेच आदिवासी जमाती मध्ये देखील आता शिक्षणाचा प्रसार होऊ लागलेला आहे. त्यामुळे हे लोक देखील आता विविध नोकऱ्यांमध्ये व धंद्यामध्ये कार्यरत असलेले दिसतात. निसर्गाच्या सान्निध्यात राहत असल्यामुळे हे लोक शारीरिक दृष्ट्या निरोगी असतात. चांगल् प्रमाणात यांचा. या योजनांमुळे आदिवासी समाजातील तरुण-तरुणी अतिशय चांगल्या पद्धतीचे शिक्षण घेऊ शकतात.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.व्ही.एन.गिते सर यांनी केले. तर आभार प्रा.बी.एच तेलोरे यांनी केले. या कार्यशाळा प्रसंगी डॉ.एल.बी.काकडे प्रा.जे.डी.आरोटे प्रा.पी.टी.करंडे श्रीमती. सुलोचना दिंधळे मॅडम, शिक्षक व शिक्षकेतर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
