हत्तीचं बळ असणाऱ्या पुढार्यांनो त्याचा वापर मराठ्यांच्या हितासाठी करा समाज तुम्हाला डोक्यावर घेईल -रामजी शिदोरे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
सकल मराठा समाजाची वेदना घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेला मराठ्यांचा लढा हि मराठा समाजाची पिढ्यानं पिढ्याची वेदना आहे. तीच वेदना घेऊन एक निस्वार्थी निष्कलंक सामान्य कुटुंबातील माणूस म्हणून जरांगे पाटील यांची ओळख उभ्या महाराष्ट्रासमोर आहे. ज्यांना मराठा समाजाची मते लागतात त्यांनी या लढ्यात सहभागी असले पाहिजे अन्यथा हा समाज त्यांना वेळप्रसंगी रस्त्यातच जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. असे परखड सवाल प्रहारचे शेवगाव तालुकाध्यक्ष अध्यक्ष रामजी शिदोरे यांनी उपोषण स्थळी येणाऱ्या पुढार्यांसमोर मांडून त्यांच्या काळजाचा ठाव घेतला. अनेक प्रश्नांची मालिका पुढार्यासह नेत्या समोर मांडून त्यांनी मराठा समाजाची चाळीस दशकांपेक्षाही अधिक काळाची व्यथा मांडून उपोषण स्थळी येणाऱ्या अनेक पद व प्रतिष्ठा मिळवलेल्या पुढाऱ्यांना निरुत्तर केलं.शिदोरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्न हा मराठा समाजाची वेदना घेऊन येत होता मात्र पुढार्यांसह नेत्यांच्या चेहऱ्यावरचा रंग मात्र ढळत होता.
शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा चौफुल्यावर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव व जोहरापूरचे माजी सरपंच अशोक देवढे यांच्या आमरण उपोषण व यावेळी कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे, प्रहारचे शेवगाव तालुका अध्यक्ष रामजी शिदोरे, शेतकरी बचाव जन आंदोलनाचे एकनाथ काळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मच्छिंद्र आर्ले, भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर, भायगावचे माजी सरपंच अशोक दुकळे, जलभूमीचे बाळासाहेब जाधव, भायगावचे माजी सरपंच अशोक दुकळे, प्रहारचे तुकाराम शिंगटे, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक भगवान आढाव, पत्रकार शहाराम आगळे यांच्यासह अनेकांनी साखळी उपोषणा सहभाग नोंदवला उपोषणादरम्यान हरिश्चंद्र जाधव, गणेश शिंदे, भाऊराव फटांगरे, देवदान वाघमारे व संजय फाटके यांनी अधिक परिश्रम घेतले. उपोषणादरम्यान शेवगाव पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार साखळी उपोषण व त्यानंतर साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण मध्ये करा या आवहानानुसार मराठा समाज अंतरवाली सराटी वरून येणाऱ्या नियमांचे पालन करत होता. भातकुडगाव फाटा चौफुल्यावर कामधेनु पतसंस्थे समोर उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला भातकुडगाव फाटाचौफुल्यावरील व्यापारी वर्गाने मोलाचे सहकार्य केले.व चालू असलेल्या सकल मराठा समाजाच्या या आरक्षणाच्या महायज्ञाला हातभार लावला त्यांचेही सर्वच सकल मराठा समाजातून कौतुक होत आहे.