ॲड देशमुख यांचे काम समाजा पुढे आदर्श

विलास तुपे
.राजूर /प्रतिनिधी
पंढरपूर आणि त्रंबकेश्वर येथे धर्मशाळा उभारत ग्रामीण भागातील वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल अकोले तालुक्यातील जामगाव येथील भजनी मंडळाच्या वतीने या धर्मशाळांचे सर्वेसर्वा व सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष तथा समाजसेवक ॲड मनोहरराव देशमुख यांचा सत्कार केला.
देशमुख यांनी अकोले तालुक्यातील केळुंगण येथे कोट्यवधी रुपये खर्च करून मोफत वृद्धाश्रम उभारला. यानंतर तालुक्यातील तसेच इतर भागातील वारकऱ्यांनी पंढरपूर, त्रंबकेश्वर या ठिकाणी धर्मशाळा उभाराव्यात अशी विनंती देशमुख यांचेकडे केली होती. धार्मिक व सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा ध्यास घेतलेल्या ॲड देशमुख यांनीही वारकऱ्यांच्या या मागणीस प्रतिसाद देत त्यांनी स्वखर्चाने पंढरपूर आणि त्रंबकेश्वर येथे सर्व सोयीसुविधायुक्त धर्मशाळा उभारल्या. यामुळे तालुक्यातील वारकऱ्यां बरोबरच इतर वारकऱ्यांची निवासाची सोय झाली.
मागील एकादशीला जामगाव येथील भजनी मंडळाने त्रंबकेश्वर येथे वारी केली. मुक्काम कुठे करायचा असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झालेला असताना या मंडळातील सदस्यांनी ॲड देशमुख यांना फोन केला आणि त्यांनीही तात्काळ आपल्या धर्मशाळेचे व्यवस्थापकांना कळवत या सर्व वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करून दिली.
आपल्या हाकेला ओ देणाऱ्या या आपल्या माणसाचे ऋण व्यक्त करण्यास हे ग्रामस्थही विसरले नाहीत. मुंबई येथून कामानिमित्त ॲड देशमुख राजूरला आल्याचे समजताच जामगावचे मृदुंग वादक माजी प्राचार्य यशवंत आरोटे,त्रंबक महाले मनोहर महाले,विकास आरोटे, बाळू बंडू महाले, शिवाजी वंडेकर, संतोष वंडेकर,प्रकाश महाले यांनी त्यांचा फेटा बांधून शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टी एन कानवडे, मुबंई येथील मुख्य कार्यकारी अधिकारी तथा संस्थचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा संस्थेचे àसंचालक चिमणराव देशमुख उपस्थित होते.
:आणि साहेबांच्या डोळ्यात अश्रू आले
साहेब मागील वर्षी आम्ही त्रंबकेश्वर येथे गेलो होतो. मुक्कामाची व्यवस्था झाली नाही. त्यावेळी आम्ही सर्वांनी एस टी बसस्थानकाच्या परिसरातच मुक्काम केला होता. थंडीचा सामना करत काढलेल्या त्या रात्रीची व्यथा जामगाव येथील वारकऱ्यांनी ॲड देशमुख यांच्या समोर मांडली आणि दातृत्व संपन्न असणाऱ्या या साहेबांच्या डोळ्यात अश्रू तरळले.यानंतर संवाद साधताना त्यांनी कधीही आपणास आवाज द्या मी ती समस्या सोडवण्यासाठी कायम तुमच्या बरोबर असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.