शिवजयंती करजगाव येथे मोफत नेत्र तपासणी!

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती निमित्ताने राज्यात अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रमातून जयंती होत आहे, त्याचेच औचित्य साधून काल 6 मार्च 2022 रोजी भारतीय जनता युवा मोर्चा अहमदनगर उत्तर जिल्हा व आनंदरुषी नेत्रालाय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने,युवा मोर्चा जिल्हा सचिव महेश पवार यांच्या प्रयत्नातून मोफत नेत्रतपासनी व अल्पदरात शस्रक्रिया शिबीर करजगाव( तालुका नेवासा) या ठिकाणी झाले,
सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत 160 रुग्णानी तपासणी केली त्यापैकी 30 जणांना आनंदरुषी नेत्रालाय अहमदनगर याठिकाणी शस्रक्रिया साठी पाठवण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून येत्या गुरुवारी सर्व रुग्णा ना नेण्यात येणार असून,अहमदनगर येथे पाठवण्यापासून ते शस्रक्रिया नंतर घरपोच करण्यार असल्याचे जिल्हा सचिव महेश पवार यांनी सांगितले, आनंदऋषी नेत्रालाय येथील सुशील गाडेकर व त्यांच्या टीम शिबिरासाठी उपस्थित होती त्यावेळी युवा मोर्चाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला, दिलेल्या सेवे बद्दल आभार देखील मानण्यात आले,त्यावेळी परिसरातील अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते
