गणोरे गावात भुरट्या चोऱ्यां … नागरिक भयभीत

गणोरे प्रतिनिधी (सुशांत आरोटे) :-.
काल रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास मोटासायकल चोरत परिसरातील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर च्या बॅटरी चोरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
गणोरे गावातील शिंदेवाडी व आहेरवाडी परिसरात रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत शेतकरी यांची मोटारसायकल चोरत शेजारील शेतकऱ्यांच्या घरासमोरील लावलेल्या ट्रॅक्टरच्या बॅटरी चोरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. ह्या चोऱ्या झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिंतेचे वातावरण झाले आहे. तसेच त्याच परिसरातील शेतकरी यांच्या शेतात असलेल्या कोंदुले झाडे तोडून टाकत नुकसान केले आहे. अशी माहिती शिंदेवाडी तसेच आहेरवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी दिली आहे.
सदर घटनेचा तपास अकोले पोलिसांनी करून तातडीने चोरांना अटक करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. तसेच गणोरे आणि परिसरातील गावांमध्ये पोलिसांची रात्रीची गस्त सुरू करत गणोरे आणि परिसरातील गावांमध्ये ग्राम सुरक्षा दल कार्यान्वित करून ग्रामसुरक्षा दलाचीही गस्त रात्रीच्या वेळेस सुरू करावेत अशी मागणी स्थानिक नागरिक यांनी केली आहे.
सदर चोऱ्यांच्या घटनेचा लवकरात लवकर तपास करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.