सुजाता स्कुल मध्ये 75 प्रजासत्ताक दिन भारतीय सैनिकांच्या गौरवाने साजरा

( विजय खंडागळे )
सोनई –२६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. यंदा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. म्हणूनच हा दिवस सुजाता स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या सकाळीच विद्यार्थी 8.00 वाजता शाळेच्या मैदानात हजर होते या दिनाचे औचित्य साधून सुजाता स्कुल मध्ये निवृत्त माजी सैनिकांना पाचारन करून त्यांच्या कामाचा गौरव करण्यात आला
कार्यक्रमाची सुरुवात तिरंगी ध्वजला मानवंदना देऊन झाली तसेच राष्ट्रगीत व ध्वजगीताने झाली सर्व मान्यवारांच्या हस्ते ध्वजरोहन पार पडले कार्यक्रमला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे संस्थापक किरण सोनवणे सर,प्राचार्या ज्योती सोनवणे मॅडम,मेजर अरुण सुखदेव फाटके, मेजर महादेव विठोबा तांदळे, मेजर संपत बाबुराव कवडे, प्रगतशील शेतकरी पांढरीनाघ भोरे, मेजर संदीप रावसाहेब कदम, मेजर भरत कोकाटे, मेजर अशोक चौधरी, मेजर सर्जेराव काळे, मेजर रामू सावळेराम आदिक, मेजर शरद दरंदले, मेजर अनिल घोरपडे, मेजर भारत ब्राम्हणे आदी मान्यवर सोनई परिसरातून उपस्थित होते
सर्व मान्यवरांचा सन्मान संस्थापक किरण सोनवणे सर यांनी केला दरम्यान UKG ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी प्रजास्त्ताक दिनाची माहिती सांगितली तसेच विविध हिंदी मराठी गीतांवर नृत्य सादर केले तसेच स्पोर्ट्स डिपार्टमेंट कडून विविध साहसी खेळांसह कराटे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले
लहान मुळांच्या लेझीम गीत व लेझीम पथकाने उपस्थितांची वाहवा मिळवली तसेच प्रमुख पाहुणे अशोक चौधरी, अरुण फाटके संपत कवडे आदींनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगितले तसेच संस्थापक किरण सर यांनी आपल्या भाषणातून प्रजासत्ताक म्हणजे फक्त हक्क मिळवणे नाही तर आपल्या कर्तव्यांची जाणीव पावलोपावली असावी असे सांगितले शाळेतील शिक्षिका कल्पना शेटे मॅडम व सविता जाधव मॅडम यांनी भाषणातून या दिनाचे महत्व सांगितले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक किसन पुंड सर यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले तर आभार सचिन चांडे सर यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन उर्मिला साळुंके मॅडम यांनी केले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले राष्ट्रीय सण विविध थीम्स सह सुजाता स्कुल साजरा करत असते म्हणून कार्यक्रमाला सोनई परिसरातील ग्रामस्थ व पालकांनी विशेष उपस्थिती दाखवली