अकोले पोलिसां नी केला सोयाबीन चोरीचा पर्दाफाश ! 19 लाख 25 हजाराचे मुद्देमालासह सहा आरोपी गजाआड !
अकोले प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासुन अकोले पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेतकऱ्यांची तयार केलेली सोयाबीन चोरी जाण्याची घटना वारंवार घडत होत्या. या बाबत अकोले पोलीस स्टेशनला शेतकऱ्यांनी गुन्हे दाखल करुन त्याबाबत तपास चालु होता. सदरप्रकरणे वारंवार घडत असल्याने मा. पोलीस अधिक्षक सो अ.नगर यांनी शेतीमाल चोरीबाबत सखोल तपास करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार अकोले पोलीस स्टेशन कडील अधिकारी व कर्मचारी असे पोलीस स्टेशन हद्दीत गस्त, नाकाबंदी व कोंम्बीग ऑपरेशन अश्या कारवाया चालु असताना दिनांक 06.03.2022 गुप्त बातमीदारामार्फत सोयाबीन चोरी करुन तिचीविक्री करण्याचे वास्तव्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली असता पोलीस पथकाने छापा टाकुन चार इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे कडे चौकशी केली असता त्यांनी सोयाबीन चोरी केलेबाबत कबुली दिली असुन त्यांचे नावे 1)अजय बाळु मेंगाळ रागर्दणी,2)लहु वाळीबा मेंगाळ रा तांभोळ, 3)विजय अशोक खोडके रा खानापुर,4)भिमराज गंगाराम मेंगाळ रा खानापुर असे सोयाबीन चोरी करणाऱ्यांची नावे असुन त्यांना तपासअंती गुन्हा रजि नं 29/2022 भा.द.वि कलम 379, 34 प्रमाणे गुन्हयात अटक करुन त्यांना मा.न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपी यांना दिनांक 10.03.2022 रोजी पर्यंतपोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली होती.पोलीस कस्टडी रिमांड कालावधीमध्ये आरोपी यांना विश्वासात घेवुन त्यांचे साथीदारांबाबत विचारपुस केलीअसता त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे साथीदारांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलीअसुन त्यांची नावे 5)मयुर लहानु मुर्तडक रा राजुर , 6) नंदु रामा भले रा दिंगबर,राजुर अशी असुन त्यांना देखील सदर गुन्ह्यात अटक केली आहे.सदर आरोपी यांचेकडुन रुपये 1,00,000/- रुपये किमतीची 25 क्विंटल सोयाबीन ही जप्त करण्यात आलीअसुन इतर आरोपी यांचेकडुन चोरी करतेवेळी वापरलेल्या चारचाकी वाहने अनुक्रमे 1)5,00,000/- रु कि ची एम एच 12 डी टी4108 , 2)7,00,000/- रु कि ची एम एच 26 एच 9193, 3)6,00,000 रु कि ची एम एच 14 ए झेड 0511, 4) 25,000/- रुपये किमंती बजाज डिस्कवर कंपनिची मोटार सायकल नं एम एच 17 ए पी 1374 असा एकुण 19,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच जप्त मुद्देमालातील पिक अप गाडी नंबर एम एच 12 डी टी 4103 ही आरोपी विजय अशोकखोडके व भिमराज गंगाराम मेंगाळ यांनी ओतुर ता जुन्नर जि पुणे येथुन चोरी केलेबाबत निष्पन्न झाला असुन त्याबाबत ओतुरपोलीस स्टेशनला गुरनं 29/2022 भा.द.वि. कलम 379 प्रमाणे दाखल आहे.सदर अटक आरोपी यांचेकडे चौकशी केली असतात्यांनी खालील प्रमाणे सोयाबीन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली असुन अधिक तपास चालु आहे.1)अकोले पोलीस स्टेशन गुरनं 29/2022 भा.द.वि. कलम 379,34 प्रमाणे रेडे शिवार ता अकोले जि अ.नगर2)अकोले पोलीस स्टेशन गुरनं 43/2022 भा.द.वि. कलम 457,380, प्रमाणे भोळेवाडी,कोतुळ शिवार ता अकोले3)ओतुर पोलीस स्टेशन जि पुणे गुरनं 29/2022 भा.द.वि. कलम 379 प्रमाणे सदर आरोपी नं 1 ते 6 हे सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असुन त्यांचेकड़े गुन्ह्यांचा तपास चालु असुन त्यांचेकडुनअधिक गुन्हे केल्याचे व त्यांचे साथीदार निष्पन्न होण्याची शक्यता असुन त्याबाबत तपास सुरु आहे.नागरिकांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, आपले गावात किंवा परिसरात कोठेही संशयीत रित्या व्यक्तीदिसुन आल्यास तात्काळ पोलीस ठाण्यास अथवा ग्राम सुरक्षा दल यांना कळवा असे आवाहन सपोनि मिथुन घुगे, यांनीं केले आहे