महिलांचा क्षणोक्षणी सन्मान होण्याची गरज-सभापती सुनिताताई दौंड

अशोक आव्हाड
पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर कौटुंबिक आणि सामाजिक जीवनातील महिलांची भुमिका लक्षात घेता केवळ एक दिवस नाही तर क्षणोक्षणी सन्मान होण्याचा त्यांचा हक्क आहे.तिच्यातील सर्जनशीलता जगाला नेहमी नाविन्य बहाल करत आली आहे.आज पर्यंतच्या इतिहासाने ते वेळोवेळी शिद्ध केले आसुन, या पुढेही तिची अशीच भुमिका राहील त्यासाठी तिचे योगदान लक्षात घेवुन प्रत्येकाने महिलांचा सन्मान केला पाहिजे, असे मत पाथर्डी पंचायत समितीच्या सभापती सुनिताताई गोकुळ दौंड यांनी व्यक्त केले.
जय भगवान युवा प्रतिष्ठान दैत्यनांदूर च्या वतीने जागतिक महिला दिनानिमीत्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करनार्या अहमदनगर जिल्ह्यातील महिलांचा सन्मानचिन्ह देवुन विषेश सत्कार केला.
संस्थेचे मार्गदर्शक एकनाथ पालवे सर यांनी प्रास्ताविक केले
यावेळी ह.भ.प रामदास महाराज शास्री (भगवान गड) भाजपा तालुकाध्यक्ष माणिक मामा खेडकर, पाथर्डीच्या प्रथम नगराध्यक्षा जनाताई सुभाष घोडके, सुभाष शेकडे सर खुपटीचे सरपंच गोरक्षनाथ तनपुरे, सामाजिक कारकर्ते नवनाथ खेडकर, भाऊसाहेब फड,व गावातील प्रतिष्ठित नागरिक या वेळी उपस्थित होते.
या वेळी पाच आदर्श महिला सरपंचाना आदर्श महिला सरपंच पुरस्काराने तसेच पाच महिला शिक्षिकांना आदर्श महिला शिक्षिका व इतर वेगवेगळ्या क्षेत्रातील पाच महिलांना समाज भुषन पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी ह.भ.प.रामदास महाराज दराडे यांनी महिलेनां संदेश दिला कि माहेरचे नाते पातळ होत असतानाच सासरकडील नाते अधिकाधिक घट्ट करण्याचा प्रयत्न प्रत्येक महिलेने करावा त्यामुळे आपल्या यशाची कमान उंचविण्यासाठी चांगले पाठबळ मिळत राहण्यास मदत होईल.
तसेच भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर,बाबुजी अव्हाड कॉलेज चे मराठी विभागप्रमुख सुभाष शेकडे सर,समाजसेवेचा वसा चालवणारे पोपटराव फुंदे, प्रा समिर नरसाळे, अरिफ बेग यांनी महिलादिनानिमीत्त महिलांना शुभेच्छा दिल्या.
तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान गावच्या प्रथम नागरिक अनुसयाताई दहिफळे यांनी भूषवले व प्रा.किरन नरसाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले
तर या कार्यक्रमाचे आयोजक प्रतिष्ठान चे संस्थापक अजिनाथ दहिफळे यांनी अभार मानले.