रतनवाडी येथे राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबीराचे आयोजन!

संजय महानोर
भंडारदरा / प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ विदयार्थी विकास मंडळ व डॉ.डी.वाय.पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविदयालय आकुर्डी यांच्या संयुक्त विदयामाने राज्यस्तरीय गिर्यारोहन शिबीराचे आयोजन रतनवाडी कळसुबाई हरिशचंद्रगड ता अकोले येथे दिनांक 17/03/2022 ते 20/03/2022 रोजी आयोजितबकरण्यात आले आहे
या शिबीरात महाराष्ट्र राज्यातील अनेक विदयापीठे सहभाग नोंदवणार आहेत. शिबीराच्या माध्यमातून विदयार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्यामध्ये धाडसी प्रवृत्ती वाढीस लागावी म्हणुन रॉक कॅंलंबींग, रिव्हर कॉसिंग, रॅफलिंग यासारखे साहसी ट्रेनिंग दिले जाणार आहेेत. निसर्गसंर्वधन तसेच निसर्गाविषयी विदयार्थ्यांच्या मनात आत्मियता निर्माण व्हावी , विद्यामधील धाडसी वृत्ती ला चालना मिळावी,इतिहासाची साक्ष असणारा रतनगड विदयार्थ्यांना पाहता यावा या सारखे अनेक उद्देश व दृष्टीकोन डोळयासमोर ठेवुन सदर शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबीर आयोजनाचे हे रौप्यमौहत्सवी वर्ष आहे.
अस म्हणतात इवलेसे रोप लावियले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. मा.प्राचार्य डॅा.मोहन वामन यांनी 1997 साली सहकाऱ्यांच्या मदतीने सुरू केलेल्या गिर्यारोहण शिबीराला या वर्षी पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत. या रौप्यमहोत्सवी वर्षाचे साक्षीदार होण्याची संधी आपणास आहे. शिबीराच्या अधिक माहीतीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाच्या विदयार्थी विकास मंडळाच्या परिपत्रक आपण पाहू शकता.
सदर शिबीराचे आयोजन डॉ.डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे अध्यक्ष,मा.डॉ.पी.डी.पाटील , उपाध्यक्ष मा.डॉ.भाग्यश्रीताई पाटील, सेक्रेटरी मा.डॉ. सोमनाथदादा पाटील, विश्वस्त मा.डॉ.स्मिता जाधव तसेच महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.