सर्वोदय विदया मंदिरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन.

अकोले/प्रतिनिधी-
उद्धरली कोटी कुळे भिमराया तुमच्यामुळे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आतोनात श्रम करून दलितांमध्ये जागृती घडवून आणली. समाज उद्धाराचे महान कार्य केले.म्हणुनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे फार महान पुढारी होते.असे प्रतिपादन उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे यांनी केले.
गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय राजूर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी उपप्राचार्य श्री.धतुरे विचारमंच्यावरून बोलत होते.
याप्रसंगी व्यासपिठावर प्रा.संतोष कोटकर,प्रा.शरद तुपविहिरे,प्रा.रमेश शेंडगे,प्रा.संतराम बारवकर,प्रा.बाळासाहेब घिगे,प्रा.सचिन लगड,प्रा.बीना सावंत, मंगळा देशमुख यांसह इतर शिक्षक विदयार्थी उपस्थित होते.
अण्णासाहेब धतुरे यांनी पुढे मार्गदर्शन करताना शिका,संघटित व्हा,संघर्ष करा .शिलवंत व्हा.पंचशिलाचे आचरन करा.असे विचार व्यक्त केले.
प्रा.संतराम बारवकर यांनी व्यक्ती किती वर्षे जगला हे महत्त्वाचे नसुन तो कसा जगला हे महत्त्वाचे असते.त्यासाठी पुस्तकाचे वाचन महत्त्वाचे आहे.डॉ.आंबेडकरांना वाचण्याचा छंद होता.पुस्तके हेच आंबेडकरांचे प्राण तसेच श्वास होता.त्यांनी व्यक्तिदोष कधी पाळला नाही.दिन दुबळ्या शोषीत वंचीतांचे नशिब बदलनारा भाग्यविधाता म्हणजेच महामानव बोधीसत्व परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर असल्याचे विचार व्यक्त केले.
प्रा.शरद तुपविहिरे यांनी गोरगरीब जनतेची सेवा करणारे,विचारांची पेरणी करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते.त्यांनी राज्यघटनेच्या माध्यमातुन न्याय मिळवून दिला.महापुरुष हे विभिन्न जातीचे,धर्माचे,वंशाचे नाही तर ते सर्वांच्या विचारांच्या आधारे जिवन व्यथित करणारे होते.हेच विचार आत्मसात करून उदयाचे भावी नागरीक घडतील असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.बीना सावंत यांनी केले. तर प्रा.संतोष कोटकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.