आजचे पंचांग व राशिभविष्य दि.१७/०३/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन २६ शके १९४३
दिनांक :- १७/०३/२०२२,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३७,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३८,
शक :- १९४३
संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- फाल्गुन
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- चतुर्दशी समाप्ति १३:३०,
नक्षत्र :- पूर्वा समाप्ति २४:३४,
योग :- शूल समाप्ति २५:०७,
करण :- विष्टि समाप्ति २५:१३,
चंद्र राशि :- सिंह,
रविराशि – नक्षत्र :- मीन – पू. भा.,
गुरुराशि :- कुंभ,
शुक्रराशि :- मकर,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०२:०८ ते ०३:३८ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०६:३७ ते ०८:०७ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:३८ ते ०२:०८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०२:०८ ते ०३:३८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०५:०८ ते ०६:३८ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
हुताशनी पौर्णिमा(होळी), होलिका प्रदीपन, अन्वाधान, कुलधर्म, पौर्णिमा श्राद्ध, भद्रा १३:३० नं. २५:१३ प.,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन २६ शके १९४३
दिनांक = १७/०३/२०२२
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)
मेष
व्यावसायिक अडचणींवर मात करता येईल. योग्य नियोजनावर भर द्यावा. नवीन गोष्टींची चाहुल लागेल. प्रवासावर खर्च होईल. बौद्धिक कौशल्य पणाला लागेल.
वृषभ
व्यवहार सजगतेने करावा. मेहनतीनुसार कमी अधिक फळ मिळेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. कृतीत प्रामाणिकपणा ठेवावा. मानसिक स्थिरता बाळगावी.
मिथुन
उष्णतेच्या आजारांपासून दूर राहावे. विरोधकांच्या कारवाया ओळखा. सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करता येईल. तुटपुंज्या ज्ञानावर खुश होऊ नका. सुप्त चळवळेपणा कामाला लावा.
कर्क
कामाची घाई करू नका. अति लोभ टाळावा. कष्टसाध्य प्रयत्नाला यश येईल. मोठ्या गुंतवणुकीत तज्ञांचा सल्ला घ्यावा. धार्मिक सहलीचे नियोजन कराल.
सिंह
खेळाडूंना चांगली संधी मिळेल. जमिनीचे व्यवहार पूर्णत्त्वाला जातील. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होईल. आळस झटकून कामाला लागावे. विरोधक माघार घेतील.
कन्या
घरातील वातावरण शांत ठेवावे. स्थावरच्या कामात लक्ष घाला. व्यावसायिक संघर्ष लक्षात घ्यावा. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी. परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा.
तूळ
वैवाहिक सौख्यात रमाल. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. यश डोक्यात जाऊ देऊ नका. कसलीही घाई उपयोगाची ठरणार नाही. सोपविलेले काम धडाडीने पूर्ण कराल.
वृश्चिक
संमिश्र परिस्थिती लक्षात घ्यावी. सरकारी मदत मिळू शकेल. प्रलोभनापासून दूर राहावे. घरात नातेवाईक गोळा होतील. कौटुंबिक कुरबुरी लक्षात घ्याव्यात.
धनू
घरगुती खर्चावर लक्ष ठेवा. बाह्यरुपावर भुलू नका. मैत्रीपूर्ण प्रेम वाढेल. क्रोधावर नियंत्रण ठेवावे. कामानिमित्त प्रवास करावा लागेल.
मकर
वडीलधार्यांचा योग्य पाहुणचार करावा. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. एकांत टाळण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक कटकटी दूर कराव्यात. उधारीचे व्यवहार टाळावेत.
कुंभ
कामाचा व्याप लक्षात घ्यावा. कलागुणांना वाव द्यावा. दानधर्मावर खर्च कराल. कागदपत्रे जपून ठेवावीत. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील.
मीन
कामात चिकाटी असू द्या. अपयशाने खचून न जाता प्रयत्न सुरू राहू द्या. वाहन जपून चालवावे. जुने मित्र भेटतील. नव्या ओळखीचा फायदा होईल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर