महाराष्ट्र
नवोपक्रमाच्या माध्यमातून उज्वल भवितव्यासाठी संशोधनाची गरज….श्री एम. डी. सिंह

पुणे..दि .17
नवोपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व अधिक गुणवत्तापूर्ण व समृध्द होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक श्री.एम.डी.सिंह यांनी केले.ते परिषदेच्या वतीने राज्यातील विविध संवर्गातून निवडलेल्या गेलेल्या नवोपक्रमशील शिक्षक,अधिकारी यांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ ह.ना.जगताप,समन्वयक विभागाचे प्राचार्य विकास गरड.प्राचार्य डॉ.कमलादेवी आवटे,डॉ.नेहा बेलसरे,संशोधन विभागाचे उपविभाग प्रमुख डॉ.अमोल डोंबाळे उपस्थित होते.
सिंग म्हणाले की,नवोपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्याची गरज आहे.गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या उऩ्नतीकरता शिक्षकांनी विविध ऩवोपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करायला हवेत.शिक्षक नवोपक्रमशील राहतील तर ते विद्यार्थ्यांच्या कायम स्वरूपी लक्षात राहतील.विद्यार्थ्यांना देखील नव्या नव्या वाटा चालण्यासाठी त्यांच्यामध्ये शक्ती भरा असे आवाहन केले.
ह.ना.जगताप यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीषद करीत असलेल्या या उपक्रमाचे कौतूक केले.अत्यंत पारदर्शी आणि गुणवत्तापूर्ण स्वरूपात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांना नमूद केले.शिक्षकांनी आपल्याला जीवंत ठेवण्यासाठी संशोधनाच्या वाटा चालाव्यात असे आवाहन केले.
राज्यात पाच गटात नवोपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पहिल्या पाच क्रमांक मिळविणा-या शिक्षक,अधिकारी यांना सन्मानचिन्ह, पुस्तक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.त्यात अध्यापकाचार्य व शिक्षण विभागातील पर्यवेक्षकिय अधिकारी गटात प्रथम क्रमाक योगेश सोनवणे ( नाशिक डायट) ,व्दितीय क्रमांक जेष्ठ अधिव्याख्याता डॉ.गंगाधर वाळले (परभणी डायट ), दीपा मिलींद सावंत ,चतृर्थ क्रमांक शिक्षणाधिकारी सुचिता आनंद पाटेकर, तर पाचवा क्रमांक शंकर केशव यादव यांना मिळाला.विषय सहायक व साधन व्यक्ती गटात प्रथम क्रमांक कविता घोडे, व्दितीय क्रमांक संदीप वाकचौरे ( अहमदनगर) तृतीय क्रमांक अनिता इंगळे,चतृर्थ क्रमाक संगिता कामडी,पाचवा क्रमांक प्रमोद झिरपे ( औरंगाबाद) , माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक नम्रता पाटील,व्दितीय क्रमांक सुधीर बंडगर, तृतीय क्रमाक शामराव रावले,चवथा क्रमांक उषा कुलकर्णी, पाचवा क्रमांक उमेश इंगळे, प्राथमिक गटात प्रथम क्रमांक राजश्री निर्वाण, व्दितीय क्रमांक दीपक डवर,तृतीय क्रमांक सचिन देसाई,चवथा क्रमाक बाबु मोरे, पाचवा क्रमाक प्रशांत चिपकर ,अंगणवाडी कार्यकर्ता ,सेविका,पर्यवेक्षक गटात प्रथम क्रमांक सौ.कांचन उमराणी, व्दितीय क्रमांक अनुराधा देशपांडे, तृतीय क्रमांक अनुजा ग्रामोपाध्ये,चवथा क्रमांक ललिता आसटकर,पाचवा क्रमांक वैशाली डेळेकर यांनी प्राप्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अमोल डोंबाळे यांनी केले.यावेळी गरड,आवटे,भोई,बेलसरे व क्रमांक प्राप्त शिक्षकांचे भाषणे झाली.यावेळी डॉ.संजीवनी महाले,डॉ.गीतांजली बोरूडे,डॉ.सौ.इसावे आदींसह परिषदेचे अधिकारी,उपविभागप्रमुख व राज्य भरातून आलेले शिक्षक,अधिकारी मोठया संख्याने उपस्थिती होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल शिनगारे यांनी तर आभार शाम राऊत यांनी मानले.