पोखरी सोसायटीवर सभापती दाते यांचे वर्चस्व कायम
,
शिवसेनेचा भगवा फडकला
दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील सर्वात मोठी असणारी पोखरी सेवा सोसायटी ची पंचवार्षिक निवडणूक मंगळवार दिनांक ७ जून २०२२ रोजी पार पडली श्री रंगदास स्वामी सहकार विकास पॅनलचे सर्वच १३ उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहे.
श्री रंगदास स्वामी विकास सहकारी पॅनलचे विजयी उमेदवार सर्व साधारण कर्जदार :- दत्तात्रय बबन आहेर – ५४१, लक्ष्मण कारभारी आहेर – ५७८, बाळासाहेब रंगनाथ कोकाटे – ५७९, सावकार भीमा गुंजाळ – ५३६, भाऊ नका दरेकर – ५८१, महादु शंकर पवार – ५५४, ज्ञानदेव गोविंद पवार – ५६७, बाबासाहेब एकनाथ रोकडे – ५३७, महिला प्रतिनिधी :- भीमबाई काशिनाथ पवार – ६०७, जयश्री मधुकर शिंदे – ६०९, अनुसूचीत जाती जमाती :- बाबाजी निवृत्ती खैरे – ५५३, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी :- पिराजी भिवा कारंडे – ५५१
जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते सर यांचे गाव असलेली पोखरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची निवडणूक मंगळवारी पार पडली यामध्ये त्यांना मानणारे सर्वच १३ उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले राष्ट्रवादी प्रणित शेतकरी परिवर्तन पॅनल मोठ्या फरकाने पराभव झाले गेल्या ४० वर्षांपासून सभापती दाते यांचे म्हसोबा झाप, पोखरी, वारणवाडी या परिसरावर निर्विवाद वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
चौकट : तालुक्यात सामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे. १५ वर्षे माजी आमदार विजय औटी यांनी पोलीस स्टेशन, तहसील मध्ये हस्तक्षेप केला नाही. आम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही. सत्तेचा उपयोग समाजकारण करण्यासाठी केला आहे. दबावतंत्र वापरणा-यांना जनता नक्कीच धडा शिकवत असते याची प्रचिती पोखरी, म्हसोबाझाप सोसायटीत लोकांनी दाखवून दिले : डॉ. प्रदीप दाते अध्यक्ष ग्राम उत्कर्ष युवा प्रतिष्ठान
विजय पॅनल ला सरपंच सतीश पवार, संतोष मोरे, संतोष आहेर, किरण आहेर, संजय काशीद, पांडुरंग काशीद ,मा. सरपंच सोपान फरतारे, कुंडलिक वाकळे, सुभाष करंजेकर, रोहिदास शिंदे, भाऊसाहेब आहेर, चेअरमन संतोष गुंजाळ, बाबाजी आहेर, गोविंद आग्रे, जयसिंग आग्रे, निवृत्ती आहेर,व्हा चेअरमन बाळू आहेर, सिताराम केदार, जानकु दुधवडे, अर्जुन पिंगळे, अशोक पिंगळे, तुकाराम कारंडे, पांडुरंग हांडे, मच्छिंद्र आहेर, बाळश्रीराम दरेकर, रामदास दरेकर, संजय आहेर, निलेश पवार, अर्जुन गाजरे, भानुदास हांडे, रमेश शिंदे, तुकाराम गुंजाळ, रोहीदास गुंजाळ, दत्ता घाडगे, प्रकाश घाडगे गोरख गुंजाळ, अशोक गुंजाळ, बाळू गुंजाळ, खंडू गुंजाळ, बाळू शिंदे, विपुल शिंदे, तुकाराम गुंजाळ,संतोष गुंजाळ, वैभव गुंजाळ यासह असंख्य कार्यकर्त्यांनी सहकार्य केले
सर्व विजयी उमेदवारांचे तालुक्याचे माजी आमदार विजयराव औटी साहेब, बांधकाम समिती सभापती काशिनाथ दाते सर, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, सभापती गणेश शेळके, तालुकाप्रमुख विकास रोहोकले, महिला आघाडी प्रमुख प्रियंका ताई खिलारी, युवा सेना तालुका प्रमुख नितीन शेळके यांनी अभिनंदन केले