पुणे विद्यापीठ व डी वाय पाटील कॉलेजचे वतीने युवक-युवती कार्यशाळा सम्पन्न

महादर्पण वृत्तसेवा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व डॉ.डी.वाय. पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविदयालय आकुर्डी महाविदयालय यांच्या संयुक्त विद्यामाने दिनांक १५ मार्च व . १६ मार्च २०२२ २ोजी दोन दिवशीय युवक युवती उन्नयनीकरण कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळे अंतर्गत स्त्री – पुरुष समानता या विषयावर चर्चा करण्यात आले..
दिनांक १५ मार्च २०२२
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात मार्गदर्शन करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक मा.डॉ. धनंजय लोखंडे तसेच मा. प्रा. शैलेजा सांगळे मॅडम यांना आंमत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.मोहन वामन होते.स्त्री – पुरुष समानता या विषयांवर मार्गदर्शन करत असताना मा.डॉ. लोखंडे सर यांनी इतिहासापासून आजपर्यंतच्या काळावर प्रकाश टाकत स्त्री – पुरुष समानता का गरजेची आहे हे उपस्थित विदयार्थ्यांना सांगितले… तर मा. शैलेजा सांगळे मॅडम यांनी स्त्री सबलीकरणावर प्रकाश टाकत विदयार्थ्याशी संवाद साधला…
दिनांक १६ मार्च २०२२
युवक युवती उन्नयनीकरण कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात मार्गदर्शनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाचे मानववंशशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख मा.डॉ. राम गंभीर तसेच सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाच्या अधिसभा सदस्या मा.सौ. बागेश्री मंथाळकर यांना
आंमत्रित करण्यात आले…
लिंग समभाव या विषयावर अगदी स्पष्टपणे ठाम मत मांडत मा.बागेश्री मंथाळकर यांनी स्त्री – पुरुष समानता हा विषय खेळीमेळीच्या वातावरणात हाताळला..
कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.पी. डी. पाटील सर, उपाध्यक्ष मा.डॉ. भाग्यश्री ताई पाटील, सचिव मा.डॉ. सोमनाथ दादा पाटील, विश्वस्त स्मिता जाधव मॕडम, प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या आयोजनात प्रा.डॉ. विजय गाडे, प्रा. ज्योती ढोबळे, प्रा.भार्गवी कुलकर्णी, प्रा.सौरभ शिंदे, प्रा. रोहीत वरवडकर, तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश फुंदे,प्रा. डाॕ. मिनल भोसले, प्रा. खलिद शेख, प्रा. हेमल ढगे यांनी सहभाग नोंदवला.
