अहमदनगर

पारनेर तालुक्यातील गोरेश्वर पतसंस्थेची निवडणूक अखेर बिनविरोध, पत्रकार राम तांबे यांची संचालकपदी वर्णी.


दत्ता ठुबे/पारनेरप्रतिनिधी-

सम्पूर्ण राज्य कार्यक्षेत्र असणाऱ्या गोरेगाव येथील मुख्यालय असणाऱ्या आणि पारनेर तालुक्यात चर्चेतील गोरेश्वर पतसंस्थेची निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली.


गोरेश्वर पतसंस्थेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक सभासदांनी निवडणुकी साठी आग्रह धरला होता.यामध्ये विद्यमान चेअरमन बाजीराव पानमंद व जिल्हा परिषदेचे मा.सभापती बाबासाहेब तांबे या दोघांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले

होते.बाबासाहेब तांबे गटाकडून पारनेर नगर पंचायतचे बांधकाम समितीचे सभापती नितीनशेठ अडसूळ,राळेगण थेरपाळ चे सरपंच पंकज कारखीले,सुपा गावचे उपसरपंच सागर मैड, दैठणे गुंजाळचे उपसरपंच संजय आंग्रे, भाळवणीचे मा.चेअरमन बाळासाहेब तरटे, गोरेगावच्या मा.सरपंच मीराताई नरसाळे,निवृत्त विस्तार अधिकारी मंज्याबापू तांबे,निवृत्त मुख्याध्यापक रामराव तांबे, पत्रकार राम तांबे अशा दिग्गजांचे अर्ज दाखल झाल्यामुळे या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते.
अतिशय सुस्थितीत असणारी ही आर्थिक संस्था झपाट्याने शाखा विस्तार करत आहे.अनेक पुरस्कार या संस्थेने मिळविले आहे.त्यामुळे राज्य कार्यक्षेत्र असणारी ही संस्था निवडणूक लागली तर विस्कळीत होईल.त्यामुळे संस्थेचे विद्यमान चेअरमन बाजीराव पानमंद यांनी बाबासाहेब तांबे यांच्या कडे बिनविरोध साठी विनंती केली.त्या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद देत बाबासाहेब तांबे यांनी ही आर्थिक संस्था टिकली पाहिजे.गावचा नावलौकिक वाढला पाहिजे या हेतूने उत्साही कार्यकर्त्यांना आवर घालत,सर्वच अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना विश्वासात घेऊन ही निवडणूक अखेर बिनविरोध केली.तालुक्यात एक चांगला संदेश या निमित्ताने दिला.गावचा एकोपा जपला.
या निवडणुक प्रक्रियेमध्ये 11 जागांसाठी 11 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध घोषित करण्यात आली.सदर निवडणूक प्रक्रियेत सहायक निबंधक कार्यालयाचे गणेश औटी यांनी काम पाहिले.

  • नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढील प्रमाणे –
  • बाजीराव शंकर पानमंद , पोपट किसन नांगरे,
  • वर्षा बाजीराव पानमंद, मिराबाई राजाराम नरसाळे, शिवाजी सुखदेव पानमंद, शिवाजी रावजी नरसाळे, रामराव बाबाजी तांबे, चंद्रभान बळवंत शेलार, मंज्याबापु बाबा तांबे, राम रावसाहेब तांबे, शंकर तुकाराम लष्करे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button