इतर
सौ.सखुबाई शेणकर यांचे निधन

अकोले /प्रतिनिधी
अकोले शहरातील कारखाना रोड येथील सौ.सखुबाई शांताराम शेणकर ( वय- 60 ) यांचे नुकतेच अल्प आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,दोन मुली,सुना, नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर अकोले येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवरांसह नातेवाईक परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.संगमनेर मर्चंट बँकेच्या अकोले शाखेचे लिपिक निलेश शेणकर,अगस्ति कारखान्यातील सुरक्षा कर्मचारी गोरख शेणकर, सौ.उज्वला दत्तात्रय नाईकवाडी व सौ.अर्चना मदन महाले यांच्या त्या मातोश्री होत..