श्रमसंस्कार शिबिर जीवन जगायला शिकवते”-
आमदार डॉ.सुधीर तांबे

अकोले प्रतिनिधी :
आपणही पन्नास वर्षांपूर्वी स्काऊट गाईड च्या माध्यमातून समशेरपुर येथे झालेल्या शिबिरात भाग घेतला होता “अशा आठवणींना उजाळा देत राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक हा श्रमाच्या माध्यमातून व सेवाभावी वृत्तीने राष्ट्र उभारणीसाठी धडपडत असतो.अशा या श्रम संस्कार शिबिरातून जीवन जगायला शिकविते असे प्रतिपादन नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे आ.डॉ.सुधीर तांबे यांनी केले.
ग्रामीण भागाच्या विकासात स्वच्छता व आरोग्य ,महिला सबलीकरण, व्यक्तिमत्व विकास, पर्यावरण संवर्धन या गोष्टींचे महत्त्व विशद केले .शिबिरातून स्वयंशिस्त ,श्रम प्रतिष्ठा ,सामाजिक बांधिलकी ,सहिष्णुता व देशप्रेम यांचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविले जातात असे मत व्यक्त केले
शिक्षण उपसंचालक पुणे विभाग, पुणे व हिंद सेवा मंडळ अहमदनगर संचलित मॉडर्न हायस्कूल व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स सोमचंद शहा कॉमर्स व भास्करराव कदम (गुरुजी) सायन्स, अकोले ,यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना (+२) स्तर विशेष हिवाळी शिबिर देवठाण या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे .या शिबिराला आ.डॉ.सुधीर तांबे यांनी गुरुवारी सदिच्छा भेट दिली.
डॉ.तांबे यांनी ग्रामीण भागाच्या विकासात स्वच्छता व आरोग्य ,महिला सबलीकरण, व्यक्तिमत्व विकास, पर्यावरण संवर्धन या गोष्टींचे महत्त्व विशद केले .शिबिरातून स्वयंशिस्त ,श्रम प्रतिष्ठा ,सामाजिक बांधिलकी ,सहिष्णुता व देशप्रेम यांचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविले जातात असे मत व्यक्त केले.व शिबिरातून केलेल्या कामाची माहिती घेत सर्वांचे कौतुक केले.
यावेळी संतोष कचरे,उपप्राचार्य दीपक जोंधळे ,सहाय्यक सचिव योगेश देशमुख, कार्यक्रम अधिकारी संपत वाळके ,सह कार्यक्रम अधिकारी सौ .मंगल कोल्हे, केदार भिंगारदिवे व ऋषिकेश नगरकर,देवठाण गावचे सरपंच .निवृत्ती जोरवर, पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण शेळके ,उपसरपंच आनंदा गिरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
