क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून चांगले खेळाडू तयार व्हावेत — वैभवराव पिचड

कोतुळ येथे छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेचे पिचड यांचे हस्ते उद्घाटन
कोतुळ प्रतिनिधी
क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून चांगले खेळाडू तयार होतील अशीअपेक्षा माजी आमदार वैभवराव पिचड यांनी व्यक्त केली
अकोले तालुक्यातील कोतुळ येथे कोतुळ प्रीमियर लीग छत्रपती क्रिकेट क्लब च्या वतीने आयोजित छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन वैभवराव पिचड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते
ते पुढे म्हणाले की खेळाच्या माध्यमातून तरुणांनी पुढे यावे यापुढील काळात चांगले सामने कोतुळ च्या मैदानावर घडून यावे या स्पर्धेतून कोतुळ च्या ग्राउंड वर निश्चित चांगले खेळाडू तयार होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली भव्य-दिव्य स्पर्धा आयोजित केल्याने क्रिकेट स्पर्धा आयोजकांचे त्यांनी कौतुक केले
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम पाटील देशमुख, राजेंद्र पाटील देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले
या प्रसंगी अकोले नगरपंचायत चे नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष ,सर्व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत घवघवीत यश मिळाल्याने राहुल साबळे यांचाही यावेळी वैभवराव पिचड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

याप्रसंगी जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे , नगराध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे वसंत मनकर सदानंद पोखरकर ,राज गवांदे सिताराम पाटील देशमुख ,अगस्ती चे संचालक बाळासाहेब देशमुख ,माजी संचालक सयाजीराव देशमुख, सोमदास पवार, राजेंद्र पाटील देशमुख, अकोला बाजार समितीचे उपसभापती भरत देशमाने संचालक बाळासाहेब सावंत ग्रामपंचायत सदस्य शंकरराव घोलप ,लंहीत चे सरपंच अर्जुन गावडे ,माजी उपसरपंच गणेश पोखरकर ,संजय लोखंडे,मनोज देशमुख भाऊसाहेब देशमुख आदी उपस्थित होते
वैभवराव पिचड यांच्या हस्ते कोतुळ प्रिय प्रीमियर लीग2022 छत्रपती क्रिकेट क्लब कोतुळ आयोजित छत्रपती चषकस्पर्धा चे उद्घाटन कोतूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वर झाले या उद्घाटनापूर्वी माजी आमदार पिचड यांनी कोतूळ गावातील विविध विकास कामांचे उद्घाटन केले तसेच भाजपाच्या कोतुळ शाखेचे उद्घाटन केले त्यानंतर त्यांची गावातून भव्य वाजत-गाजत मिरवणूक काढली यावेळी गावातील ग्रामस्थांनी त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले
