संदीप वाकचौरे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत व्दितीय!

संगमनेर प्रतिनिधी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर येथील विषय सहायक संदीप वाकचौरे यांनी व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय ,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था शिक्षणाधिकारी , साधन व्यक्ती विषय सहायक अशा वेगवेगळ्या प्रकारांच्या गटांसाठी या प्रकारचे आयोजन राज्यस्तरावरून करण्यात येते.
आरंभी जिल्हा स्तरावर सहभागी झालेल्या स्पर्धेकामधून राज्य स्तरावर ती पहीले सात नवोपक्रम राज्यस्तरावरती पाठविण्यात येतात. आलेल्या सर्व नवोपक्रमामधून तज्ज्ञ मार्गदर्शक पहिल्या दहा नवोपक्रमाची निवड करत असतात.राज्यातून निवड झालेल्या पहिल्या दहा नवोपक्रमांना राज्यस्तरावर सादरीकरण करण्याची संधी मिळते.संदीप वाकचौरे यांनी बालवाचनालायाद्वारे भाषिक विकास हा नवोपक्रम सादर केला होता. या नवोपक्रमाला राज्य स्तरावर व्दितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
परिषदेचे संचालक एम.डी.सिंह, उपसंचालक डॉ.कमलादेवी आवटे, डॉ.नेहा बेलसरे,विकास ग्रँड, शिक्षण तज्ज्ञ हे.ना.जगताप, संशोधन विभागाचे उपविभाग प्रमुख डॉ.अमोल ओंबाळे, डॉ.संजीवणी महाले यांच्या हस्ते पुणे येथील कार्यक्रमात वितरित करण्यात आले.यशा बदल शिक्षण अधिकारी भास्कर पाटील, प्राचार्य भगवान गायके,रंजना लोहकरे, परशुराम पावसे,के.के.पवार यांनी अभिनंदन केले आहे.