जत (जि.सांगली) येथे ओबीसी गोलमेज परिषद संपन्न
सांगली प्रतिनिधी
म.फुले ,राजर्षिशाहू महाराज डॉ.बी आर आंबेडकर व पेरियार यांच्या विचारधारेवर आधारित ओबीसींचा राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या निर्धाराने दुसरी ओबीसी राजकीय गोलमेज परिषद जत जि.सांगली येथे यशस्वीरित्या संपन्न झाली
हिंदू, लिंगायत, मुस्लिम,बौद्ध, ख्रिश्चन अशा सर्व धर्मातील ओबीसी भटक्या विमुक्त बारा बलुतेदार जातीसाठी दूसरी ओबीसी गोलमेज परिषद जत जि.सांगली येथे रविवार दिनांक २० मार्च २०२२ रोजी नदाफ मल्टीपर्पज हॉल येथे संपन्न झाली.
गोलमेज परिषदेत अध्यक्ष पदावरून बोलतांना प्रा श्रावण देवरे म्हणाले की ओबीसी समाज बळकट व्हावा म्हणून रामस्वामी पेरीयार,राम लखन चंदापूरी,कर्पूरी ठाकूर ,बिंदेश्वरी प्रसाद मंडल,जनार्दन पाटील, दि. बा.पाटील,कर्मवीर दत्ता दळवी,मुकुंद पाटील भुजबळ, सी. डी.पाटील,माधवराव वाघ, हनूमंत उपरे काका, शरद ताजणे,शरद यादव,लालुप्रसाद यादव,मुलायमसिंग यादव यांनी फार मोठे योगदान देऊन ओबीसी समाजाच्या पदरात थोडे पडले ते सध्याचे ओबीसी नेते घालविण्यात व्यस्त आहेत.
गेल्या 70 वर्षात ओबीसींची जनगणना होत नाही .प्रस्थापित पक्ष भाजपची केंद्रात सत्ता आहे इमपरिकेल डेटा देत नाही
महाराष्ट्रातील प्रस्थापित काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी इंपिरिकल डेटा गोळा करणेसाठी आवश्यक निधी देत नाही .ओबीसींच्या वाट्याचे महाज्योतीचे 125 कोटी रु काढून मराठा समाजाच्या सारथी पुरवत आहेत तसेच मागासवर्गीय महामंडळाचे 109 कोटी काढून घेतले जात आहेत .ओबीसींचे राजकीय आरक्षण कडून घेतले आहेच नोकऱ्यांमधील प्रमोशन मधील आरक्षण बंद केले आहे .
ओबीसींवरल अन्याय सुरूच आहे .प्रस्थापित पक्षातील नेते मात्र ओबीसीं नेते खोटी आश्वासन देऊन , ओबीसींची फसवणूक करत आहेत . त्यांना डोळे असून दिसत नाही तोंड असून ते बोलत नाहीत असे नेते आहेत हे नेते निवडणुकीच्या वेळी मोकळे सुटतात वाटेल ते खोटी आश्वासने देऊन फसवत आहेत .
राज्यात मागासवर्गीयांच्या 100 हुन जास्त संघटना आहेत त्या प्रस्थापित पक्षांच्या दावणीला बांधल्या आहेत . निवडणुकीच्या वेळी एखाद्य पक्षाला पाठिंबा पत्र देऊन10 ते 15 हजार रु घेऊन गप्प असतात .इतरवेळी प्रस्थापित पक्षांनी मेळावे घ्या सांगितले शेपाचशे रुपये मिळाले की पळायला लागतात .त्यांना ओबीसींचे सोयरसुतक वाटत नाही .
*या देशात गेले 74 वर्षात अनेक मोर्चे आंदोलने झाली मात्र ओबीसी मागासवर्गीयवरील अन्याय कमी झाला नाही .दिल्लीच्या सीमेवर 10000 शेतकऱ्यांनी 1 वर्ष उपोषण केले .700 शेतकरी शहीद झाले . तरीही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नव्हते मात्र उत्तर प्रदेश व पंजाब निवडणूक नजीक आल्याच्या पाहून शेतकरी विरुद्ध कायदे रद्द केले .प्रस्तापित सर्व पक्ष ओबीसींच्या मोर्चे आंदोलने उपोषण याला घाबरत नाही तर ते फक्त निवडणुकांना घाबरते .म्हणून या गोष्टी करत वेळ घालवण्यापेक्षा ओबीसींचा पक्षात काम करून ओबीसीविचार धारे सतेवर येऊन तामिळनाडू सारखी
*राजकीय व्यवस्था निर्माण करूया असे* म्हणून ओबीसींचा पक्ष स्थापन करण्याचे
रणशिंग फुंकले.
गोलमेज परिषदेत जत तालुक्यातील व तालुक्याबाहेरील अनुभवी तज्ञ कार्यकर्त्यांनी भाग घेतला. या मध्ये ओबीसी विचारवंत व अभ्यासक व इतर मान्यवरांनी परिषदेच्या सुरवातीला फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषाना अभिवादन करून करण्यात आले.
उदघाटक म्हणून शशिकांत आमणे यांनी भाषण केले या मध्ये ओबीसी चे आरक्षण चालले आहे त्याचे ओबीसी विद्यमान प्रतिनिधीना गांभीर्य नाही , ओबीसी आरक्षण गेले तरी आम्हाला पर्वा नाही मात्र ह्या नंतर शैक्षणिक नोकरांच्या आरक्षण जाणार आहे म्हणून ओबीसींची राजकीय व्यवस्था निर्माण करण्यासाठी ओबीसीं sc st नाचा फुले शाहू आंबेडकर विचारांचं राजकीय पक्ष निर्माण करावा लागेल.प्रा देवरे सरांच्या राजकीय विचारानं पाठबळ देण्यासाठी आम्ही जमले आहोत असे सांगितले. आम्हाला ओबीसीच्या दुर्दशा का झाली आहे.ते समजून दिले.प्रस्थापित पक्ष कसे जबाबदार आहेत ते सांगितले .तसेच प्रस्थापित पक्षातील ओबीसी नेते कसे जबाबदार आहेत ते समजून दिले.
तसेच
आजच्या सभेचे प्रास्ताविक रवींद्र सोलनकर ओबीसी परिषदेचे मुख्य आयोजक यांनी केले .या मध्ये ओबीसी वर अन्याय कोण करत आहे ?त्यातून मार्ग कसा कसा काढवायचा या विषयी सांगितले
तसेच आजच्या सभेचा हेतू सांगितला
*
त्यानंतर सभेस उपस्थित मान्यवरांनी आपले मत मांडले.
त्यामध्ये अरविंद येलपले (अखिल भारतीय माली संघ अध्यक्ष ) बाशा पाथरवट (जिल्हा अध्यक्ष मुस्लिम समाज सांगली जिल्हा) मुबारक नदाफ जत ‘,प्रा गौतम शिंगे व इंजि शिवाजीराव शेंडगे (अध्यक्ष मौर्य क्रांती संघ सांगली)
आपल्या मनोगता मध्ये जत तालुका शेतकरी संघटनेचे नेते रमेश माळी म्हणाले आम्हा शेतकऱ्यांना प्रस्थापित पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱयांचे गेली 70 वर्षे शोषण कसे होते ते सांगितले त्यासाठी ओबीसींचा मासिहा देवरे सरांच्या विचाराने क्रांती घडवूया असे आव्हान केले .
तुकाराम माळी म्हणाले की सद्यस्थितीमध्ये प्रस्तापिताकडून ओबीसी वर्गाचे न्याय हक्क डावलले जाऊ लागले आहेत. त्यामुळे ओबीसी वर्गाला सक्षम राजकीय पर्याय निर्माण करावा लागणार आहे. त्यासाठी अनुभवी तज्ञांचे मत जाणून घेऊन ओबीसी वर्गाला स्वतःच्या राजकीय पक्षाची स्थापना करावी लागणार आहे. त्यासाठी टिकाऊ,भक्कम,सक्षम,विधानसभेच्या मोठ्या संख्येने जागा मिळविणारा समता प्रस्थापित करणारा ओबीसी पक्ष स्थापन व्हावा म्हणून ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदेत
प्रा.वाघमोडे टी एम सर म्हणाले ओबीसींचा पक्ष नसल्याने दुसऱ्याच्या जागेवर जाऊन फळ झाडे वाढवून फळाची अपेक्षा केल्यास आपल्या फळे मिळत नाहीत .तसेच आजच्या ओबीसी च्या दुर्दशा ही प्रस्थापित पक्षातील स्वार्थी नेत्यांमुळे आली आहे .त्यासाठी ओबीसींची राजकीय स्वंतत्र तामिळनाडू सारखी व्यवस्था असावी असे सांगितले
या दुसऱ्या ओबीसी राजकीय गोलमेज परीषदेत प्रा श्रावण देवरे यांच्या “ओबीसी जनगणना: जीवघेणा संसदीय ससंघर्ष या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन संपन्न झाले.
ही गोलमेज परिषद यशस्वी होण्यासाठी
प्रा शिवाजी कुलाळ तुकाराम माळी, रवींद्र सोलनकर, ,रमेश उर्फ चिकु माळी,भैराप्पा माळी यांनी योगदान दिले तर तायाप्पा वाघमोडे, जक्काप्पा सर्जे, आमणेसर येलपलेसर,बादशहा पाथरवट, शिवाजीराव शेंडगे, पांडुरंग वाघमोडे सर,पुजारी सर ,राजेंद्र माळी, प्रा.पी आर वाघमोडे ,आबा गावडे,कुशाबा करे,मुबारक नदाफ, हाजीसाहेब हुजरे, एन्.के.हिप्परकरसर ,आशाराम चौगुले आदी मान्यवर परिषदेस उपस्थित होते.