रिक्षा चालक ध्येयवेड्या तरुणाची वाचनालय चालविण्याची धडपड!

शुभम चव्हाण
औरंगाबाद प्रतिनिधी
भारतात बेरोजगारीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. बहुसंख्य तरूण वर्ग नोकरीच्या शोधात चिंतातूर असलेले पहायला मिळतात. या परिस्थितीत उच्चशिक्षिण घेऊन नोकरीच्या मागे न लागता कष्टाने रिक्षा चालवून मिळालेल्या पैशातून समाजासाठी काही देणे लागतो या भावनेतून एका रिक्षाचालकाने मेहनतीच्या
पैशातून ग्रामीण भागातील मुलांसाठी वाचनालय सुरु केले आहे.
भगवान मुंढे असे या तरुणाचे नाव आहे. दिवसभर रिक्षा चालवून आपल्या राजश्री शाहू सार्वजनिक वाचनालयासाठी
पुस्तक खरेदी करून मुलांसाठी ज्ञानची कवाडे खुली करण्याचे काम या तरुणाचे केले आहे. आधी डी. एड. पदविका प्राप्त
केली. नंतर पत्रकारितेचे उच्च शिक्षणही घेतले. मात्र नोकरी मिळली नाही. पण पोटासाठी काहीतरी काम आवश्यक होते.
काय करावे या परिस्थितीत या तरुणाने मग आपल्या उच्च शिक्षणाचा तोरा न मिरवता रिक्षा चालवण्याचा व्यवसाय निवडला. आपला उदरनिर्वाह चालावा एवढाच त्याचा हेतू होता. नंतर काही पैसे हाती शिल्लक राहू लागल्याचे लक्षात येताच
या तरुणाने ग्रामीण भागातील मुलांसाठी या तरुणाने आपल्या सिनगाव जहाँगीर (ता. देऊळगावराजा, जि. बुलडाणा) येथे
वाचनालय सुरु केले. या वाचनालयात दर महिन्याला किमान एक किंवा दोन पुस्तके खरेदी करुन त्याने गावातील
मुलांना शिक्षणात मदत करायला सुरुवात केली. मागील पाच वर्षांपासून त्याचे हे का सुरु आहे. २०१६ मध्ये चार पुस्तके
खरेदी करुन त्याने आपल्या या कार्याला।सुरुवात केली. आज त्याच्या वाचनायलात जवळपास एक हजार पुस्तकें आहेत.
वाचन हे मेंदूला आवश्यक असणारे खाद्य आहे, असे विज्ञान मानते. तसेच “पुस्तक वाचलं की मस्तक सुधारतं” या
म्हणीला या तरुणाने साद घालत आपली वाटचाल सुरु ठेवली आहे. भगवानची घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्याने
आपले १०वी पर्यंतचे शिक्षण गावातच पूर्ण केले. आपले भविष्य गावात नाही, असे समजल्यानंतर त्याने गाव सोडून
पुढील शिक्षणासाठी तो औरंगाबादमध्ये आला. हॉटेलमध्ये काम करत त्याने औरंगाबादच्या देवागिरी महाविद्यालयातून
बारावीचे शिक्षण पूर्ण केले.महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमातील प्रा. शिवानंद भानुसे यांच्या व्याख्यानमुळे
वाचनाची आवड लागली व पुढे ” भगवान मुंढे सध्या औरंगाबादमध्ये एकटेच राहतात.कुटुंब गावाकडे आहे.
दिवसभर शहरात रिक्षा चालवतात. आज तरूणाईची स्वप्नेही मोठीमोठी आणि चकमकीत स्वरूपाची आहेत.
पणया सर्वांच्या पलीकडे विचार करून भगवानने समाजभान जपले आहे. महाविद्यालयाचे संगीत विभागप्रमुख डॉ.
तुकाराम वांढरे यांच्या प्रेरणेने सिनगाव जहाँगीर गावात राजश्री शाहू सार्वजनिक वाचनालय सुरु केले. हळूहळू हे वाचनालय
विस्तारत आहे. या वाचनालयात शासकीय परिपत्रकानुसार व त्याच्यापुढे एक पाऊल टाकत महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी

साजरी करण्यात येते. वाचनालयातर्फे गुणवंत विद्याथ्यांचा, महिलांचा सत्कार, निबंध स्पर्धा, रक्तदान शिबिर आदी
उपक्रम घेतले जात आहेत. विशेष म्हणजे जनसामान्यांत वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी प्रोत्साहनपर राजमाता
जिजाऊ माँसाहेब वाचन प्रेरणा ज्योतही वाचनाकडे वळावे..
“आजच्या पिढीने वाचनाकडे वळावे. वाचनाशिवायपर्याय नाही.माझ्याबद्दल सांगायचं झाले तर, घरी गुंठाभर जमीन
नाही.आई वडील लोकांच्या शेतात मजुरी करतात.गावकडे काहीहोणार नाही हे लक्षात आल्याने मी गाव सोडले.डी.एड.
साठी मुंबईला नंबर लागला पण मुंबईत राहून शिकण्याची ऐपत नव्हती पण मी स्व. गोपीनाथ मुंडे यांची भेट घेतली.गोपिनाथ
मुंडे यांच्या मदतीमुळे माझे डी.एड.चे शिक्षण पूर्ण झाले.आज माझ्यापरीने वाचनालायातून गावातील मुलांच्या भविष्यासाठी होईल तेवढी मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतोय.
भगवान मुंढे काढली जाते. सिनगाव जहाँगीर ते माँसाहेब
जिजाऊ जन्मस्थळापर्यंत सिंदखेडराजा येथे ही ज्योत पायी जाते. या वाचनालयाचा विद्यार्थी व महिला मिळून सुमारे शंभर
जणांना लाभ होतो. त्याच्या या कार्यासाठी काहीजण मदत करायला उत्सुक आहेत.
