श्री ढोकेश्वर विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या श्री ढोकेश्वर माध्य.उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी सोहम संतोष सोनावळे व राजवर्धन किसन धुमाळ यांच्या अंधासाठी चष्मा तसेच अंधासाठी काठी या उपकरणाला जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळाला व त्यांच्या उपकरणांची राज्यस्तरावर निवड झाली आहे. अहमदनगर जिल्हा गणित, विज्ञान प्रदर्शन नुकतेच पाथर्डी येथील श्री तिलोक जैन विद्यालयात पार पडले यामध्ये सोनावळे व धुमाळ यांच्या उपकरणास हा बहुमान मिळाला.

त्यांच्या या उपकरणास तालुका स्तरावर वडझिरे येथे आयोजित गणित विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळाला होता.या विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक श्री.राहुल झावरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विजेत्या विद्यार्थ्यांचे जिल्हा मराठा संस्थेचे अध्यक्ष.नदंकुमार झावरे पा, संस्थेचे सचिव जी.डी.खानदेशी, जेष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी सर, मा.सभापती राहुल झावरे पा,सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.भाऊसाहेब खिलारी, विद्यालयाचे प्राचार्य सुरेश जावळे, पर्यवेक्षक सावंत सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.