राजापूर महाविद्यालयात मशरूम कल्टिवेशन कार्यशाळा……

अकोले प्रतिनिधी
प्रागतिक शिक्षण संस्थेचे नूतन कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजापूर दिनांक 25 मार्च 2022 रोजी आयोजित एक दिवसीय मशरूम कल्टिवेशन कार्यशाळेमध्ये एस के ऑरगॅनिक मशरूम कंपनीचे ओनर सिद्धेश खतोडे यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून ,धिंगरी अळिंबीचे उत्पादन करण्यासाठी सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य संस्थेचे पदाधिकारी ही सर्व उपस्थित होते. कार्यशाळेच्या दुसऱ्या सेशन मधे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आर.पी.हासे साहेब यांनी भूषवले तसेच कार्यक्रम प्रसंगी प्रागतिक शिक्षण संस्थेचे पदाधिकारी भारत शेलकर साहेब देखील उपस्थित होते. विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये प्रामुख्याने संगमनेर महाविद्यालय सह्याद्री महाविद्यालय साकूर महाविद्यालय येथून आलेल्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या हिताच्या आहे त्याचप्रमाणे कौशल्याभिमुख शिक्षण काळाची गरज आहे असे महत्वाचे विचार मांडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष कडलग सर यांनी मशरूम विषयीचे समज गैरसमज यावर प्रबोधन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुभाष वर्पे यांनी केले , तसेच आभार प्रदर्शन प्राध्यापिका भरीतकर मॅडम यांनी केले. याप्रसंगी विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक या कार्यक्रमास उपस्थित होते. सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.