व्होडा फोन- आयडिया च्या
कार्यालया समोर कामगारांची निदर्शने

पुणे प्रतिनिधी
व्होडा फोन- आयडिया या मोबाईल सेवा, ईंटरनेट सेवा पुरविनाऱ्या कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर आज कामगारांनी पुण्यात निदर्शने केली.
इंटरनेट आणि मोबाइल सेवा देणाऱ्या या कंपनीत लाखो ग्राहकांना व्यवस्थित सेवा देण्यासाठी मोबाईल टाॅवरचे महत्वपूर्ण काम असतें या टाॅवरचे देखभाल, दुरुस्ती, दैनंदिन देखभाल करण्या साठी सन 1998 पासून नाममात्र कंत्राटदार व्दारे कामगार कंपनी मध्ये कार्यरत व नियमीत सेवेत होते. कंपनीने कामगारांना पुर्व सुचना नोटीस न देता नाममात्र कंत्राटदार प्रिझम सर्व्हीसेस प्रापरटी सोल्युशन प्रा लि कोथरुड पुणे कंपनी ने दि 2 सप्टेंबर 2021 रोजी ईमेल व्दारे कामगारांची सेवा संपुष्टात आणली. या सोबत कामगारांना देय रक्कम दिलेली नाहीं . सदरील बाब चुकीचे व बेकायदेशीर असून कामगार कायद्यातील तरतूदी चा भंग करणारे असल्यामुळे भारतीय मजदूर संघ संलग्न असणाऱ्या ठेकेदार कामगार संघ ने मागील सेवा शर्ती सह पूर्ववत कामावर घेण्याची मागणी केली
. कामगारांना पुर्ववत कामावर घेण्या साठी व्होडा फोन- आयडिया कंपनी च्या शारदा सेंटर कार्यालय पुणे समोर तिव्र निदर्शने केली
. या कामगारांना त्वरित न्याय न मिळाल्यास कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा ठेकेदार कामगार संघांचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिला आहे
मागील काळात कंपनी मध्ये सुमारे 5000 पेक्षा जास्त कामगार व विविध एजन्सी वतीने महाराष्ट्रात कार्यरत होते. पण कंपनी ने टप्पा टप्पा ने कामगार संख्या कमी केली. कामगारांनी कंपनी च्या प्रगतीसाठी व विकासासाठी मोठे योगदान दिले होते. दि 2 सप्टेंबर 2021 रोजी कमी केलेल्या कामगारांनी कोव्हीड लाॅकडाऊन कालावधीत , स्वतःच्या , कुटुंबाची जिवाची पर्वा न करता सतत कार्यरत राहुन समाज हिताचे महत्वपूर्ण काम केले आहे. पण या योगदानाचा विचार न करता व्यवस्थापनाने कामगारांना कामावरून बेकायदेशीर रित्या कमी केल्या बद्दल रोष व्यक्त केला.
निदर्शने नंतर व्होडा फोन- आयडिया कंपनी, प्रिझम सर्व्हीसेस व भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी यांच्या समावेत चर्चा झाली व कामगारांना देय रक्कम, नुकसान भरपाई कामगारांच्या् प्रलंबित प्रश्न समजुन घेवून लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन कंपनी च्या वतीने देण्यात आले
.
या आंदोलनाचे नेतृत्व ठेकेदार कामगार संघांचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, कामगार प्रतिनिधी श्री नवनाथ गुंडगळ, प्रदीप कोंढाळकर, अनिल किर्दक , रूपेश बारसकर, सुधीर जोशी यांनी केले. या आंदोलनात अर्जुन चव्हाण अध्यक्ष भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा, महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे कार्याध्यक्ष उमेश आणेराव, संघटन मंत्री राहूल बोडके यांनी मार्गदर्शन केले.
