मुक्त विद्यापीठ माजी विद्यार्थी संघ व कृषी विज्ञान केंद्राचा उपक्रम

४१ रक्त पिशव्यांचे केले संकलन
नाशिक दि 2 अल्युमनी असोसिएशन ऑफ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ४१ रक्त पिशव्यांचे संकलन झाले.
जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे उदघाटन अल्युमनी असोसिएशन ऑफ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अध्यक्ष तथा कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष तथा विद्यापीठाचे वित्त अधिकारी भटूप्रसाद पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजाराम पाटील, अंतर्गत गुणवत्ता आश्वासन केंद्राचे संचालक डॉ. सूर्या गुंजाळ, सहायक कुलसचिव चंद्रकांत पवार आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. दिनेश भोंडे म्हणाले की, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे एका रक्तदात्यामुळे तीन गरजू लोकांना याचा फायदा मिळू शकतो. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने रक्तदानासाठी पुढे आले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये समाजासाठी संवेदनशीलता, सेवाभाव निर्माण करण्यास अशा प्रकारच्या शिबिरांमुळे मदत होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव संतोष साबळे यांनी केले.
अल्युमनी संस्थेचे माजी विद्यार्थी, विद्यापीठाचे शिक्षक व शिक्षकेतर अधिकारी, कर्मचारी, कृषि शिक्षण केंद्रातील विद्यार्थी अशा ४१ दात्यांनी मोठ्या उत्साहात रक्तदान केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या खजिनदार कविता देव, डॉ. नितीन ठोके, डॉ. संजीवनी महाले, हेमराज राजपूत, मंगेश व्यवहारे तसेच रक्तपेढीचे डॉ. गोविंद कुलकर्णी, प्रसाद नातू, प्रदीप देशमुख, श्वेता वर्घट, दीपाली इंगळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.