शनिशिंगणापूरात दोन लाखाहून भाविकांचे शनिदर्शन!

गुढीपाडवा पारंपारिक पद्धतीने साजरा
कोरोनाचे नियम शिथिल केल्याने भाविकाचा ओघ
विजय खंडागळे
सोनई प्रतिनिधी
आज दि.२ एप्रिल २०२२रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लाखो शनीभाविकानी शनिमस्तक होऊन दर्शन घेतले
दोन वर्षानंतर प्रथमच केंद्र सरकार व राज्यसरकारने कोविड १९ चे निर्बंध हटवल्याने भाविकांनी शनिदर्शनसाठी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती..
प्रवरासंगम येथून ५०० स्थानिक कावडधारकांनी पाणी आणून शनिदेवाला स्नान, विधिवत पूजा केली ,गाठी,बेसन,पुरी, लाडू,शेरणी,असा पारंपरिक पद्धतीने अनेकानी नैवेद्य अर्पण करून गुढीपाडवा साजरा करण्यात आला. या प्रसंगी कावडधारकांनी आणलेल्या जलाची गावातून भव्य ढोल ताश्याच्या व आतषबाजी करत मिरवणूक काढण्यात आली होती. मंदिर परिसरात व चौथरा ठिकाणी फुलांची सजावट केलेली होती. सकाळी १२ वा.त्रिंबक महाराज यांच्या हस्ते व मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.शनिवार असल्याने शनिभाविकाची व स्थानिक परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.अनेकांनी मिठाईचे, स्टेशनरी, पूजेचे साहित्य,,प्रसाद,आदी दुकाने थाटली होती.देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर,उपाध्यक्ष विकास बानकर, सरचिटणीस आप्पासाहेब शेटे,प्रा.शिवाजी शेटे,पोपटराव कुऱ्हाट, छभुराव भूतकर, बाळासाहेब बोरुडे, शनिभक्त सोनी,पोपट शेटे,पत्रकार विजय खंडागळे,पोलीस पाटील ऍड.सायराम बानकर आदी तळ ठोकून होते.
सलग दोन वर्षातून देवस्थाने बंद होते,आता भाविकांना दर्शनासाठी सर्व नियम शिथिल केल्याने व ओमीक्रोम विषाणू रोग कमी झाल्याने गुढीपाडव्याच्या निमित्ताने दोन लाखाहून अधिक भाविकांनी दिवसभर आवर्जून हजेरी लावून शनिदेवाचे दर्शन घेतले.
प्रवेशद्वार, मंदिरपरिसर,शनिचौथरा ठिकाणी विदयुत रोषणाई, आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. ठीक ठिकाणी भाविकांना प्रसादाचे शनिभक्तांकडून वाटप करण्यात येत होते. भावीकांची गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्त स.पो.नि.रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली तैनात करण्यात आला होता.
दिवसभरात अनेक मान्यवरांनी विधिवत पूजा करून शनिदर्शन घेतले.
सोमवारपासून शनिशिंगणापूरात
अखंड हरिनाम सप्ताह नियोजन
दोन वर्षानंतर प्रथमच सोमवार दि.४/४/२२ते ११ /४/२२ पर्यंत रोजी उदासी महाराज यांच्या स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होणार असल्याने त्यामध्ये कीर्तनकार, प्रवचनकार, यांची किर्तन रूपी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे वतीने करण्यात आले आहे. ही सेवा दोन वर्षांपासून कोविड १९ मुळे बंद होती.यावर्षी चालू झाल्याने भाविकांना याचा आनंद घेता येईल. देवस्थानचे पदाधिकारी ,कार्यकारी अधिकारी जी.के.दरदले हे व्यवस्था वर लक्ष ठेऊन होते.विशेष अतिथीचा सन्मान कार्यकारी अधिकारी जी.के.दरदले, व उपकार्यकरी अधिकारी नितीन शेटे हे करत होते.दिवसभर भाविकांचा ओघ चालू होता.