हिंगणगाव ने सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी पवार तर उपाध्यक्षपदी ढवळे यांची बिनविरोध निवड

शहराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजली जाणारी हिंगणगाव ने सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण नारायण पवार यांची तर व्हाचेअरमन पदी आबासाहेब नारायण ढवळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवड निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विखे यांनी काम पाहिले तर संस्थेचे सचिव सोमनाथ डांगरे यांनी त्यांना सहकार्य केले. याप्रसंगी संचालक बबन पवार, गंगाधर दारकुंडे, यशवंत पवार, दिगंबर वाबळे, रामू पवार, रावसाहेब पवार, संभाजी बामदळे, सुभाष आहेर, नाथा मांजरे, सौ. वर्षा महादेव पवार, सौ. मिराबाई जनार्धन वाबळे, यावेळी उपस्थित होते. अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली होती. संस्थेवर सलग चौथ्यांदा चेअरमन लक्ष्मण पवार यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. रामातात्या आहेर, भीमा आहेर, रामनाथ पवार, देविदास पवार, नानाभाऊ बर्डे, देविदास पवार, अरुण पवार, बंडू बामदळे, विनोद पवार, सुदाम ढवळे, अनिल दौंड, संजय वाकळे, शिवनाथ वाकळे, बन्सी आहेर, जनार्धन वाबळे, मच्छिंद बामदळे, प्रकाश पवार, महादेव पवार, हिंगणगाव ने च्या लोकनियुक्त सरपंच सौ वर्षाताई महादेव पवार उपसरपंच अजित अशोक पवार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. या निवडीचे जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. राजश्रीताई घुले, माजी आमदार नरेंद्र पाटील घुले पाटील, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांनी या निवडीचे स्वागत स्वागत करून अभिनंदन केले आहे.