इतर
आंभोळ येथील श्री आंबिका माता यात्रा उत्सव संपन्न !

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील मुळा परिसरातील अंभोळ येथे श्री अंबिका माता प्रसन्न यात्रा उत्सव संपन्न
अंभोळ गावातील महिला मुलं-मुली भाविक भक्त सहभागी झाले होते जागरण गोंधळ च्या वेळेस मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तांनी जल्लोष केला यावेळेस महिलांनी फुगडी खेळत देवीची गाणी गायलेली गावातील ग्रामस्थांबरोबर महादेववाडी पैठण येथील भाविक भक्त ही उपस्थित झाले होते
सर्वात प्रथम आंभोळ ते श्री क्षेत्र ओझर येथून ज्योत मंडळाने ज्योत घेऊन आले यामध्ये टी-शर्ट सौजन्य पोपट चौधरी सर यांनी दिले. पारंपरिक पद्धतीने सकाळी अंबिका माता देवीची पूजा करण्यात आली होम हवन जागरण गोंधळ करण्यात आला
त्याच प्रमाणे पारंपारिक पद्धतीने काठीची मिरवणूक तसेच विविध कार्यक्रम राबविण्यात आले
यामध्ये गावातील ग्रामस्थांचा उत्कृष्ट सहभाग होता गावातील महिला तरुण उपस्थित होते देवीची पूजा राजेंद्र भाऊसाहेब चौधरी ( मेजर ) सपत्नीक यांच्या हस्ते अंबिका मातेची पूजा करण्यात आली
सायंकाळी महाआरती झाली गावातील सर्व ग्रामस्थांनी
महाप्रसादाचा लाभ घेतला गावातील चौधरी वस्तीतील महिला तसेच तरुण मित्र मंडळा कडून मंदिर परिसरातील स्वच्छता करण्यात आली
संध्याकाळी जागरण साठी अंबिका माता यात्राउत्सव निमित्त झलक महाराष्ट्राची भव्य आर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता
त्यामध्ये नारळ वाढवण्याचे काम श्री राजेंद्र दशरथ चौधरी तसेच राजेंद्र भाऊसाहेब चौधरी मेजर दत्तात्रय महादू चौधरी दिलीप माधव चौधरी व पोपट चौधरी सर यांनी केले
अंबिका माता यात्रा उत्सव मध्ये सर्व अंभोळ पैठण महादेव वाडी कोतुळ परिसरातील ग्रामस्थ भाविक भक्त उपस्थित होते