आदिवासींच्या पारंपारिक वनस्पतींच्या ज्ञानाचा उपयोग समाजातील सर्व घटकांना व्हावा – डाॅ.आशिओ माओ

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
आदिवासींना अवगत असलेल्या पारंपारिक वनस्पतींच्या ज्ञानाचा उपयोग समाजातील सर्व घटकांना व्हावा असे मत भारतीय वनस्पतीशास्त्र सर्वेक्षनालया चे प्रमुख मा.आशिओ माओ ( कोलकत्ता )यांनी मांडले.
डाॅ.डी.वाय.पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविदयालय आकुर्डी व वनस्पतीशास्त्रात सर्वोच्च गणल्या जाणा-या इंडियन असोसिएशन आॅफ अॅन्जीओस्पम टॅक्साॅनाॅमी संस्था यांच्या संयुक्त विदयमाने कळसुबाई हरिशचंद्रगड अभयारण्यात आयोजित केलेल्या तीन दिवशीय आंतरराष्ट्रीय परिषदेत भंडारदरा येथे ते बोलत होते.
वनस्पती व मानव यांचा घनिष्ट संबध तसेच कोरोना सदृश्य परिस्थितीनंतर मानवाला निसर्गाचे उमगलेले महत्त्व यामुळे वनस्पतीशास्त्र विषयाचा अभ्यास ही काळाची गरज मानली जाते. सहयाद्रीच्या रांगेत येणारे कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात अनेक नामशेष झालेल्या प्रजातींचे आस्तित्व आढळते. या नामशेष प्रजाती तसेच इथे आढणा-या विविध नाविण्यपुर्ण वनस्पतींची माहिती जगभरातील वनस्पतीशास़्त्रज्ञांना व्हावी जैविकविविधतेने नटलेला डोंगरद-यांचा परिसर अभ्यासकांना अभ्यासता यावा हा उद्देश डोळयासमोर ठेवून या आंतराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे मागील तीस वर्षात प्रथमच प्रत्यक्ष अभयारण्यात या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेत वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करण्या-या जगभरातील 250 वनस्पतीशास्त्रज्ञांनी सहभाग नोंदवला. परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय वनस्पतीशास्त्र सर्वेक्षणालयाचे प्रमुख मा.डाॅ.आशिओ माओ, सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाचे प्रकुलगुरू डाॅ.एन.एस.उमराणी, परिषदेचे आयोजक प्रमुख व डाॅ.डी.वाय.पाटील आकुर्डी महाविदयालयाचे प्राचार्य डाॅ.मोहन वामन तसेच आय.ए.ए.टी चे अध्यक्ष मा.डाॅ. शशिधरन, उपाध्यक्ष मा.डाॅ.एस.आर.यादव, सचिव डाॅ.संतोष नॅंम्पी, वनविभागीय अधिकारी मा.गणेश रणदिवे, तसेच एन.सी.एल.चे शास्त्रज्ञ मा.डाॅ.अशोक गिरी, वनस्पतीशास्त्रज्ञ मा.डाॅ.प्रभा भोगावकर, सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाचे वनस्पतीशास्त्राचे मा.डाॅ.मिलींद सरदेसाई, प्रा.डाॅ.महेंद्र ख्याडे हे उपस्थित होते. परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.भागवत ढेसले यांनी केले तर आभार डाॅ.मुकेष तिवारी यांनी मंाडले.
परिषदेच्या उद्घाटनानंतर दुस-या सत्रात मा.डाॅ.आशिओ माओ व मा.डाॅ.अशोक गिरी यांनी व्याख्यान दिले.
या आंतरराष्ट्रीय परिषदेत वनस्पतीषास्त्राचा विविध अंगाने अभ्यास करणा-या वनस्पतीशास्त्रज्ञांनी संशोधन स्पर्धेत भाग घेत त्यांचे संशोधन पोस्टर तसेच पाॅवर पाॅईंट पेझंेटेषनच्या माध्यमातुन उपस्थितांसमोर मांडले. या स्पर्धेत प्रामुख्याने प्रो.एम.साबु अवाॅर्ड, प्रो.मनीलाल अवाॅर्ड, प्रो.टी.आर साहु अवाॅर्ड, प्रो.राव अवाॅर्ड अशा पुरस्कांरांचा समावेश आहे.
सदर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन डाॅ.डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे अध्यक्ष मा.डाॅ.पी.डी.पाटील साहेब, उपाध्यक्ष मा.डाॅ.भाग्यश्रीताई पाटील सेक्रेटरी मा.डाॅ.सोमनाथदादा पाटील, विश्वस्त मा.डाॅ.स्मिता जाधव तसेच डाॅ.डी.वाय.पाटील महाविदयालय आकुर्डी महाविदयालयाचे प्राचार्य डाॅ.मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले तर परिषदेच्या आयोजनात महाविदयालयातील प्रा.डाॅ.मुकेश तिवारी, प्रा. डाॅ.भागवत देसले, प्रा. सतीष ठाकर, प्रा.मंजुशा कोठावदे, प्रा.हेमल ढगे, प्रा. करिश्मा स्ययद, प्रा. खालीद शेख,प्रा.चेतन सरोदे, प्रा. बबलू नवले, प्रा.रोहित वरवडकर, प्रा. राधाकृष्ण ठाणगे, प्रा.संध्या पाटील, प्रा.गणेश फुंदे या प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला.
