शेवगाव मध्ये इंधन दरवाढ व महागाई विरोधात निदर्शने

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
देशातील वाढती बेरोजगारी व महागाई मुळे सर्व सामान्य गोरगरीब कष्टकरी जनता त्रस्त असताना जनतेमध्ये फुट पाडण्यासाठी भावनिक प्रश्न निर्माण केले जात आहेत. जनतेने अश्या फुटपाड्या शक्ती पासून सावध राहायला हवे व आपल्या मुख्य प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनचळवळी उभ्या कराव्यात असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसेक्रेटरी कॉ. ॲड सुभाष लांडे व राज्य कौन्सिल सदस्य संजय नांगरे यांनी केले
भारतीय कम्युनिस्ट पक्ष व ऑल इंडिया युथ फेडरेशन स्टुडंट्स फेडरेशन व किसान सभेच्या च्या आवाहनानुसार आज शेवगाव येथे बसस्थानकानजीक क्रांती चौक येथे बुधवारी ( दि .६ ) भारतीय कम्युनिस्ट पक्ष व ऑल इंडिया युथ फेडरेशन च्या वतीने तीव्र निदर्शने करून भाववाढ रोखण्यासाठी अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पेट्रोल डिझेल गॅस सह जिवनावश्यक वस्तूंची महागाई कमी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात किसान सभेचे बबनराव पवार, आत्माराम देवढे, दत्तात्रय आरे, बाबुलाल सय्यद, राम लांडे, अनिल कांबळे,राम सोनवणे, संजय भुजबळ,जय मगर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.