इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.२९/१०/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक ०७ शके १९४६
दिनांक :- २९/१०/२०२४,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२९,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०५:५७,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- व्दादशी समाप्ति १०:३३,
नक्षत्र :- उत्तरा समाप्ति १८:३४,
योग :- ऐंद्र समाप्ति ०७:४८,
करण :- गरज समाप्ति २३:५४,
चंद्र राशि :- कन्या,
रविराशि – नक्षत्र :- तुला – स्वाती,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- वृश्चिक,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- स. ०८प. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०३:०५ ते ०४:३१ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी १०:४७ ते १२:१३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:१३ ते ०१:३९ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:०५ ते ०४:३१ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
भौमप्रदोष, गुरुद्वादशी, धनत्रयोदशी, यमदीपदान, त्रयोदशी श्राद्ध,
————–

: 🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक ०७ शके १९४६
दिनांक = २९/१०/२०२४
वार = भौमवासरे(मंगळवार)

मेष
आनंदी भावना वाढीस लागेल. धार्मिक कार्यात सहकार्य कराल. व्यवसायात नवीन बादल होतील. त्याचा नंतर फायदा मिळेल. आरोग्य बाबत जागरूक रहा.

वृषभ
कामात क्षुल्लक अडचणी येतील. नोकर वर्गा कडे लक्ष ठेवा. कौटुंबिक बाबतीत चालढकल करू नका. शेजारी सहकार्य करतील. सकारात्मक विचार करा.

मिथुन
जुनी कामे पूर्णा होतील. नवी गुंतवणूक कराल. कौटुंबिक दुरावा वाढू शकतो. वाहन विषयक अडचणी येऊ शकतात. घाई घाईने निर्णय घेऊ नका.

कर्क
अध्यात्मा विषयी ओढ वाढेल. भौतिक सुखसोयी वाढतील. विवेक बुद्धीने कामे करा. इतरांच्या उणिवा काढू नका. अभिमान वाढू शकतो.

सिंह
मौल्यवान गोष्टी पासून लाभ होईल. गरीबांना मदत कराल. लोक तुमच्यामुळे प्रभावित होतील. कार्य क्षमतेत वाढा होईल. अध्यात्मात रस घ्याल.

कन्या
तुमचा प्रभाव वाढेल. दिवस मनाप्रमाणे घालवाल. अनावश्यक खर्चा सामोरे येतील. मनाला येईल तसे वागाल.. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

तूळ
मेहनती मुळे तब्येत नरम राहील. चार चौघात संयमाने वागाल.. कुटुंबाकडून चांगली बातमी मिळेल. तुमच्या जबाबदारीत वाढ होईल. लोक तुमचे कौतुक करतील.

वृश्चिक
आजचा दिवस संमिश्र आहे. पोटाच्या तक्रारी जाणवतील. अनावश्यक खर्च होतील. त्यामुळे मन खट्टू होईल. मंगल कार्यालयात सहभाग घ्याल.

धनू
सामाजिक उपक्रमात वेळ घालवाल. भौतिक गोष्टीत फार अडकू नका. मन जवळच्या माणसापाशी मोकळे करा . आरोग्याकडे लक्ष ठेवा. रखडलेले पैसे मिळतील.

मकर
स्वत:चे निर्णय क्षमता वापरा. सामाजिक वादात अडकू नका. खर्च फायदेशीर ठरेल. परोपकाराची भावना जोपासाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

कुंभ
नवीन संकल्प कराल. आध्यात्मिक आवड जोपासाल. घरात तुमच्या आमचे कौतुक होईल. कामात वडीलांचे सहकार्य मिळेल. आवडते छंद जोपासाल.

मीन
नसत्या चिंता करू नका. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल. बढतीसाठी प्रयत्न करा. बोलण्यातून प्रभाव पाडाल. नातेवाईकांची गाठ पडेल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button