गणोरे येथे बिबट्यांची दहशत.बिबट्याने पाडला वासराचा फडशा….

.,
गणोरे प्रतिनिधी :- (सुशांत आरोटे)
आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास गणोरे (ता.अकोले) येथील कौठ बेट परिसरात श्री ज्ञानेश्वर मुरलीधर आंबरे या शेतकऱ्याच्या गोठ्यातून बिबट्याने वासराची शिकार केली.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतकरी बाहेर आपल्या ओट्यावर झोपला असता पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वासराचा आणि गाईचा हंबरण्याच्या आवाजाने मुलाला जाग आली तर समोर पाहतो तर बिबट्याने …इतक्या प्रेमाने वाढवलेल्या वासराला आपल्या जबड्यात पकडलेले आणि तो त्याला ओढत ओढत ओट्यापर्यंत घेऊन आला होता.मुलाने जोरा जोरात आवाज करत असल्याने घरातील सर्व माणसे जागी झाले आणि माणसांच्या आवाजाने बिबट्याने तिथेच शिकार सोडून पळाला शेतकरी त्या वासराजवल जाऊन पाहतात तर वासरू निपचित पडलेले होते हे दृश्य पाहून फार वाईट वाटले.घरातील मंडळी आपल्या घरात जाऊन बाहेर कुठ बिबट्या दिसतो की काय हे पाहत होते,असे करत करत अर्ध्या तासाने बिबट्या समोरील बाजूने पुन्हा शिकार ज्या ओट्याजवल सोडली होती ती शिकार नेण्यासाठी परत आला..आणि शिकार घेऊन पसार झाला.
बिबट्यांची गणोरे आणि परिसरात प्रचंड दहशत वाढली आहे. मागेही अभिनव नगर येथील उगले परिवाराच्या घरा शेजारी कोबड्यावर हल्ले केले तेव्हा बिबट्या जेरबंद करण्यात आला. तसेच भास्कर सहाणे यांच्या घरा समोरील ओट्यावरून अनेक कोंबड्या पकडलेच्या व्हिडिओ पाहिलेत.. आताच काही दिवसांपूर्वी आहेरवाडी परिसरातील अरुण गणपत आहेर यांच्या वासराची देखील शिकार केली, नाही तर पुनः आज दुसऱ्या शेतकऱ्यांचे गो- धनाचा बिबट्याने पडशा पडला. अश्या पध्यातीने शेतकऱ्यांच्या अनेक गो- धनांची बिबट्याने शिकार करून मारले आहे.अनेक कोंबड्या, शेळ्या,मेंढ्या,बिबटे तरस यांच्या भक्ष स्थानी पडले आहेत.
वनविभागाचे अधिकारी नेहमी प्रमाणे येतात पंचनामे करून आपली जबाबदारी पार पाडली आहे असे दाखवतात पण प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान भरपाई मिळाली हा देखील संशोधनाचा विषय आहे राहिला आहे? सरकारी नियमानुसार किती रक्कम मिळते ? खरचं तितक्या किमतीत ते गो धन शेतकऱ्यांना घेता येणे शक्य आहे का? हेही पाहणे आवश्यक आहे.? या सर्व बाबींचा विचार गांभीर्याने करणे गरजेचे आहे.
कौट बेट परिसरातील शेतकरी बिबट्याच्या पूर्णपणे दहशतीखाली आहे.तातडीने वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावेत.तसेच शेतकऱ्याला तातडीने भरीव मदत द्यावी. आहे ती मदत अतिशय तुटपुंजी आहे शासनाने यात अजून भरीव वाढ करून शेतकऱ्यांना कमीत कमी कागदपत्रे आणि वेळेत मदत मिळावी.अशी मागणी वसुंधरा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री भाऊ पाटील आंबरे यांनी केली आहे.