वैभव कुमार मैड यांची मराठी साहित्य सम्मेलनात निवड.

राजूर प्रतिनिधी
वैभवकुमार मैड यांची सलग दुसऱ्यांदा मराठी साहित्य सम्मेलनात निवड झाली आहे
.अकोले तालुक्यातील राजूर गावचे सुपुत्र वैभव कुमार मैड यांच्या कवितेची मागील वर्षी नाशिक येथे झालेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निवड झाली होती. या वर्षी उदगीर, लातूर येथे दि.२२, २३ आणि २४ एप्रिल २०२२ रोजी होणाऱ्या ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांच्या। ” माय आमुची सिंधुताई” या कवितेची निवड झाली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत सेवा बजावत असतानाही आपली आवड जपत त्यांनी आजवर शंभरहून अधिक कविता लिहिल्या आहेत. साहित्य संमेलनातपर्यंत पोहोचणं हे प्रत्येक कवीचं स्वप्न असतं, दरम्यान हे स्वप्न दुसऱ्यांदा प्रत्यक्षात आल्याबद्दल त्यांनी आयोजक यांचे आभार मानले आहेत.
अकोले तालुक्यातून एकमेव निवड असल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.