इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि १८/१०/२०२३

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन २६ शके १९४५
दिनांक :- १८/१०/२०२३,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२५,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:०४,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- शरदऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- चतुर्थी समाप्ति २५:१३,
नक्षत्र :- अनुराधा समाप्ति २१:०९,
योग :- आयुष्मान समाप्ति ०८:१८,
करण :- वणिज समाप्ति १३:२३,
चंद्र राशि :- वृश्चिक,
रविराशि – नक्षत्र :- कन्या – चित्रा,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- बुध – तुला २५:१७,
शुभाशुभ दिवस:- दु. ०१प. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी १२:१४ ते ०१:४२ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:२५ ते ०७:५२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:५२ ते ०९:१९ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:४७ ते १२:१४ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०४:३६ ते ०६:०४ पर्यंत,

❀ दिन विशेष:
विनायक चतुर्थी, संक्रमण पुण्यकाल सूर्योदय ते १२:२४, अमृत २१:०१ प., भद्रा १३:२३ नं. २५:१३ प.,
————–

:

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन २६ शके १९४५
दिनांक = १८/१०/२०२३
वार = सौम्यवासरे(बुधवार)

मेष
मनाची चंचलता जाणवेल. अती विचार करू नका. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. कार्यक्षेत्रात मान मिळवाल. मुलांच्या प्रगतीने आनंद होईल.

वृषभ
कामे मनाप्रमाणे मार्गी लावाल. जमिनीचे व्यवहार कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. प्रेम संबंधात गैरसमज टाळा. अधिकारी वर्ग सकारात्मक बातमी देतील.

मिथुन
इतरांच्या मदतीला धावून जाल. कौटुंबिक गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष द्याल. नवीन कामे हाती येतील. कौटुंबिक सदस्यांशी मतभेद संभवतात. बौद्धिक कसोटी लागू शकते.

कर्क
लहान प्रवास कराल. वडीलधार्‍यांना विरोध करू नका. जुने ठरवलेली कामे पूर्ण कराल. विरोधकांच्या कारवाया मावळतील. हस्तकलेत चिकाटी बाळगा.

सिंह
मानसिक रित्या खंबीर रहा. तूर्तास धाडसी निर्णय नकोत. कुटुंबासाठी काही खरेदी कराल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन विचार तत्काल अंमलात आणावा.

कन्या
किरकोळ गोष्टींमुळे मनस्ताप वाढू शकतो. तडजोडीला पर्याय नाही. कामात एकाग्रता ठेवा. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या. मित्रांना मदत कराल.

तूळ
अघळपघळ शब्द वापरू नका. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. तुमच्या बुद्धिकौशल्यावर लोक खुश होतील. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. लहान भावंडांना मदत कराल.

वृश्चिक
मुलांबरोबर वेळ घालवाल. क्रोध वृत्तीत वाढ होऊ शकते. दिवसाची सुरवात मेहनतीत जाईल. फिरायला जाण्याची इच्छा प्रबळ होईल. जोडीदारासोबत वेळ व्यतीत कराल.

धनू
नातेवाईकांच्या गाठी पडतील. कौटुंबिक कामाने थकून जाल. तरुण वर्गाकडून काही नवीन शिकायला मिळेल. मनोकामना पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करा.

मकर
मुलाखतीत यश येईल. भावंडांची इच्छा जाणून घ्या. कामात उत्साह जाणवेल. दिवसभराच्या कामाचे चिंतन करा. व्यवसायात चांगला नफा मिळेल.

कुंभ
योग्य ठिकाणी गुंतवणुकीवर भर द्या. क्षुल्लक गैरसमजूत वाद वाढवू शकते. चर्चेतून नवीन कल्पना सुचतील. मानसिक चलबिचलता वाढवू नका. भावंडांची मदत घ्यावी.

मीन
घाई-घाईने कामे करू नयेत. नियोजनावर अधिक भर द्यावा. सासुरवाडीचे लोक मदत करतील. अनावश्यक खर्चाला आळा घालावा. नवीन कामाची रूपरेषा आखावी.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button