कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याला देशभरातील विद्वानांची भेट.!

विलास तुपे
राजूर प्रतिनिधी
डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी, पुणे यांच्यावतीने यश रिसॉर्ट, कळसूबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्य ता. अकोले, जि. अहमदनगर, महाराष्ट्र येथे ‘डॉक्युमेंटेशन, बायोप्रोस्पेक्टिंग आणि जैवविविधता संरक्षण’ या विषयावर 31 वी IAAT परिषद आणि आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. या परिषदेत सुमारे 250 संशोधक अभ्यासक सहभागी झाले होते. या परिषदेचा मुख्य उद्देश सहभागींना क्षेत्रीय निरीक्षणाचा अनुभव प्रदान करणे आणि त्यांना महाराष्ट्रातील समृद्ध वनस्पतींची माहिती करून देणे हा होता. कारण त्यापैकी बहुतेक अभ्यासक हे महाराष्ट्राच्या बाहेरील होते. गेल्या ३० वर्षांत पहिल्यांदाच प्रत्यक्षात जंगलात ही परिषद आयोजित केली होती. डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकुर्डीचे प्राचार्य डाॕ. मोहन वामन हे या परिषदेचे आयोजक सचिव होते. डॉ.डी. वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती तथा डाॕ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय डॉ. पी. डी.पाटील सर व डॉ.डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे सचिव डॉ.सोमनाथदादा पाटील यांनी सहकार्याने या परिषदेचे आयोजन केले होते.
ही परिषद 5 एप्रिल ते 7 एप्रिल 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. वनस्पतीशास्त्राचे संशोधक व या क्षेत्रातील नामवंत व्यक्ती या समारंभासाठी उपस्थित होत्या. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद् घाटन भारतीय वनस्पतीशास्त्र सर्वेक्षणलयाचे प्रमुख डाॕ. आशिओ माओ तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डाॕ. उमराणी सर यांचे हस्ते झाले होते. या परिषदेत वनस्पतीशास्त्राचा विविधी अंगाने केलेल्या अभ्यासाचे सादरीकरण संशोधकांनी उपस्थितांसमोर केले. प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन वनस्पतींचा अभ्यास केला. अशा विविध उपक्रम या परिषदेच्या माध्यमातून पार पडले.
या परिषदेच्या समारोपप्रसंगी ज्या संशोधकांची उत्कृष्ट शोधनिबंध सादर केले त्या संशोधकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रारंभी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. डाॕ. मिलिंद सरदेसाई यांनी पाहुण्याचे व उपस्थितांचे स्वागत केले. प्रा.डाॕ. मुकेश तिवारी यांनी परिषदेच्या अहवालाचे वाचन केले. आयोजन समितीतील सर्व प्राध्यापकांनाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. IAAT चे उपाध्यक्ष मा. डॉ. एस. आर. यादव, सचिव डॉ. संतोष नॕम्फी, सचिव मा. डाॕ. नरसिंहन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानंतर आपल्या अध्यक्षिय मार्गदर्शनात IAAT चे अध्यक्ष मा.डाॕ. एन. शशीधरन यांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाचा हेतू, उद्देश व फलित सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.भागवत ढेसले यांनी केले तर उपस्थितांचे आभार या परिषदेचे सचिव मा. प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांनी मानले.


परिषदेच्याच्या संयोजनामध्ये प्रा. डाॕ.मुकेश तिवारी, प्रा. भागवत ढेसले,प्रा. मंजुषा कोठावदे, प्रा. हेमल ढगे, प्रा. करिश्मा सय्यद, प्रा. मयुर मुरकुटे, प्रा. राधाकृष्ण ठाणगे, प्रा. चेतन सरवदे, प्रा. खलिद शेख, प्रा. सतिश ठाकर, प्रा. संध्या पाटील, प्रा.गणेश फुंदे, प्रा. बबलू नवले, प्रा. रोहित वरवडकर सहभाग घेतला होता.