भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

सोनई- प्रतिनिधि
–मूळा एज्युकेशन सोसायटीच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, शारीरिक शिक्षण व खेळ विभाग व न्यू अर्पण ब्लड बँक अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन 9 एप्रिल 2022 रोजी करण्यात आले होते.
या शिबिरात शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून 51 बॅग रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन सोनई गावचे सरपंच श्री. धनंजय वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झिने, सोनई ग्रामपंचायतीचे सदस्य सुनील तागड, IQAC समन्वयक डॉ.जगदीश सोनवणे, भूगोल विभाग प्रमुख डॉ. राजेश वाघ प्रा. महेश जंगले, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. रवींद्र खंदारे इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य ज्ञानदेव जिने होते, यावेळी श्री. धनंजय वाघ श्री. सुनिल तागड, न्यू अर्पण ब्लड बँकेच्या संचालिका डॉ. भाग्यश्री पवार व त्यांच्या सहकारी टीमचे स्वागत व सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय मनोगतात डॉ. ज्ञानदेव झिने यांनी विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन केले. डॉ. भाग्यश्री पवार यांनी रक्तदानाचे महत्व व गरज यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत एन.सी.सी. प्रमुख कॅप्टन डॉ. सुरेश जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. तुकाराम जाधव यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. शरद औटी यांनी केले.