पद्मशाली महिलाही प्रत्येक क्षेत्रात पुढे’.. …महापौर श्रीकांचना यन्नम

पद्मशाली सखी संघमच्या ‘एक्झिबिशन’चे थाटात प्रारंभ..
सोलापूर : गेल्या अनेक वर्षांपासून सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. पद्मशाली महिलाही प्रत्येक क्षेत्रात स्वत:चे ठसा उमटविताना दिसत आहेत. चुल आणि मुल या व्यतिरिक्त जग आहे हे ओळखून पाऊल उचलावे. यासाठी कुटुंब कर्त्यांनेही साथ दिले पाहिजे, असे मत सोलापूर महापालिकेच्या तत्कालीन महापौर श्रीकांचना यन्नम यांनी व्यक्त केल्या.
पद्मशाली सखी संघमच्या वतीने समाजातील महिलांच्या परिश्रामाला दालन उपलब्ध व्हावे, या हेतूने ‘एक्झिबिशन कम् सेल’ चे छोटेसे दालनाचे सोय ३०, ३१ जुलै रोजी सकाळी ९ ते रात्री नऊ यावेळेत दाजीपेठ येथील श्रीराम मंदिर देवस्थान येथे केले असून ‘एक्झिबिशन’च्या शुभारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, महिलांना संधी दिल्यास त्यांच्यातील कला-गुणांना वाव मिळेल. आज जरी छोटे दालन असलेतरी भविष्यात मोठ्या स्वरुपात रुपांतर झाले पाहिजे. पद्मशाली सखी संघमच्या वतीने महिलांच्या रोजगारासाठी केलेल्या प्रयत्नांना दाद दिल्या पाहिजेत. असे उपक्रम वर्षातून किमान दोन वेळा जरी झाल्यास समाजातील महिला कर्तृत्वाने संधीचे सोन्यात बदल घडवतीलच. यावेळी रोटरी एमआयडीसीच्या लता चन्ना, अध्यक्षा माधवी अंदे या व्यासपीठावर उपस्थित होत्या.