टाकळी ढोकेश्वर पोलीस ठाणे कार्यान्वित करा :किसन धुमाळ

दत्ता ठुबे
पारनेर/प्रतिनिधी :
टाकळी ढोकेश्वर भागासाठी प्रशासनाकडून स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर करण्यात आले आहे. हे पोलीस ठाणे ८ सप्टेंबर २०२१ रोजी मंजूर झाले असल्याची माहिती आहे. परंतु दहा महिने उलटूनही अद्याप टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी पोलीस ठाणे कार्यन्वित करण्यात आली नाही या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते कोरठण खंडोबा देवस्थानचे विश्वस्त किसन धुमाळ यांनी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, नगर ग्रामीणचे पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांची भेट घेत टाकळी ढोकेश्वर येथील पोलीस स्टेशन संदर्भात चर्चा केली.
दरम्यान टाकळी ढोकेश्वर येथील पोलीस ठाणे हे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी त्यांनी मागणी केली.
तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने तसेच प्रशासनाच्या दृष्टीने व पोलिस विभागाच्या दृष्टीने टाकळी ढोकेश्वर पोलीस ठाणे लवकरात लवकर कार्यरत होणे सगळ्यांच्या दृष्टीने फायदयाचे व सोयीचे आहे. असे यावेळी भेट घेत किसन धुमाळ यांनी पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.