मोफत पौरोहित्य’ शिका सोलापूरात २ एप्रिलपासून एक वेगळा उपक्रम
.
‘
सोलापूर : सोलापूरात अनोखा उपक्रमांसाठी ख्याती असलेल्या श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली सप्तपदीच्या वतीने समस्त महिलांसाठीच ‘पौरोहित्य वर्ग’ डॉ. सौ. अपर्णाताई कल्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या २ एप्रिलपासून दर रविवारी संध्याकाळी ५ वाजता सुरवात करण्यात येत आहे, अशी माहिती फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश पासकंटी यांनी दिले आहे.
एक चांगले विचार, अनेक दुष्ट विचारांना परावृत्त करते त्यामुळे पौरोहित्य शिकल्यामुळे चांगले विचारही मनात भिनते तसेच समाजात बघण्याचा दृष्टीकोन बदलतो म्हणून श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली सप्तपदीच्या वतीने अभिनव उपक्रम म्हणून समस्त महिला वर्गासाठी ‘विनामूल्य’ पौरोहित्य वर्ग घेण्यात येत आहे. यासाठी गेल्या एक वर्षांपासून फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांनी पाठपुरावा आणि प्रयत्न करत आहेत. पूर्व भागातील श्री मार्कंडेय रुग्णालय जवळील ‘श्रीराम मंदिर’ येथे आयोजन केले आहे. आतापर्यंत तब्बल ३० महिलांनी नांवनोंदणी केले असून अजूनही ज्या महिलांना सहभाग होण्याची आवड असेल अशांनी १ एप्रिलपर्यंत (9021551431) फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांच्याशी संपर्क साधावेत. पौरोहित्य वर्गासाठी सौ. वरलक्ष्मी रव्वा यांचेही सहकार्य मिळाले.
‘नि:शुल्क’ असलेल्या पौरोहित्य वर्गासाठी जास्तीत जास्त संख्येने महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशनचे मार्गदर्शक गणेश पेनगोंडा, सल्लागार सुकुमार सिध्दम (काका), पद्मशाली ज्ञाती संस्थेचे माजी कार्यकारिणी विश्वस्त सदस्य दयानंद कोंडाबत्तीनी, माजी निमंत्रक सदस्य नागेश सरगम, उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, लक्ष्मण दोंतूल, श्रीनिवास रच्चा, किशोर व्यंकटगिरी, अंबादास गुर्रम, मधुसूदन माचरला, अंबादास आधेली, बालाजी कुंटला, नवनीत पोला यांनी केले आहे.