पारनेर तालुका पोल्ट्री चालक संघाची स्थापना !

पारनेर प्रतिनिधि
पोल्ट्री व्यवसायात येणाऱ्या अडचणी सोडण्यासाठी पारनेर तालुका पोल्ट्री चालक संघाने पुढाकार घेऊन तालुक्यातील सर्व पोल्ट्री धारकानां एकत्र करत पोल्ट्री चालक संघाची नोंदणी करुन कायदेशीर मार्गाने लढा देण्यासाठी सज्ज झाला आहे.
त्याचेच पहिले पाऊल म्हणुन पोल्ट्रीधारकांच्या समस्यांचे निवेदन दिनांक ०५ रोजी सर्व कंपन्यांना देण्यात आले.
पारनेर तालुक्यात करारपध्दतीने पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या सर्वच कंपन्याना निवेदने देण्यात आली. प्रिमियम फिड्स, उर्जा फिड्स, बारामती ॲग्रो, सीपी फिड्स, वेंकिग्ज आंनद ॲग्रो, पावसन्स फिड्स इ. सर्व कंपन्याना प्रत्यक्ष भेटुन निवेदने देण्यात आली. त्यामध्ये ग्रोविंग चार्जेस, लिफ्टिंग चार्जेस, अॅग्रीमेंट संदर्भातील योग्य पध्दतीने मुद्दे मांडुन त्यामध्ये योग्य ते बदल करण्याबाबतचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव भोसले यांनी लिफ्टिंग संदर्भात सांगितले की, पक्षी लिफ्टिंग चार्जेस १ रु प्रति पक्षी मिळावा किंवा टेडर्सनी लेबर स्वतः आणावे. त्याप्रमाणे संघटनेचे उपाध्यक्ष प्रविण धरम म्हणाले की, पारनेर तालुक्यात कोणत्याही पोल्ट्री व्यावसायिक कंपनीला नविन ॲग्रीमेंट करताना संघटनेचे ना हरकत प्रमाणपत्र जोडावे लागेल. जर संघटनेचे पत्र नसेल तर होणाऱ्या नुकसानीस कंपनी जबारदार राहील. यावेळी सचिव राजाराम गजरे, कोषाध्यक्ष संतोष पानंमद, संचालक संकेत सुपेकर, नवनाथ राळे, स्वप्नील भोसले, गणेश झावरे, संजय खिलारी, धनंजय ढोकळे, अमोल नरवडे पांडुरंग वाळुंज रंगनाथ शिंदे अनिल हिंगडे अरविंद वाबळे सल्लागार ॲड. संदिप शेंडकर, पांडुरंग पवार, रामदास ताठे, राजेश शेळके, संतोष दाते, किसन नरवडे, स्वप्नील रोडे व विशाल गुंड आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पारनेर तालुका पोल्ट्री चालक संघाचे संचिव राजाराम गजरे यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व पोल्ट्री व्यावसायिकांनी एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहनही केले आहे.