संत परंपरेमुळेच भगवी पतका उभी -स्वामी त्रिवेंदानंद सरस्वतीजी

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
ज्ञानाचा आणि वैराग्याचा सन्मान करता आला,त्याच समाजाला शांती पदाला पोहचता येते. नाथ सांप्रदयामध्ये निष्काम भक्ती केल्यास निश्चित फलपाप्ती होते. कारण जगाला सामर्थ्य पुरावण्याचे शक्ती नाथांच्या झोळीत आहे. धर्मगुरुचा मोठेपणा जोपासता आला पाहिजे, आज जगामध्ये संतामुळेच भगवी पताका तेवत आहे असे परखड मत
अखंड भारतीय महाराष्ट राज्य संत परिषदेचे अध्यक्ष व इंदुवासीनी देवी गणेशानंदगड पिपळनेर संस्थानचे ह.भ.प. स्वामी त्रिवेंदानंद सरस्वतीजी महाराज यांनी व्यक्त केले.
शेवगाव- नेवासा राजमार्गावरील भायगाव येथील शेकडे वस्तीवरील ग्रामदैवत नवनाथ बाबा मंदिराच्या
प्रांगणात सालाबादप्रमाणे आयोजित धर्मनाथ बीज उत्सावातील किर्तनात महाराज बोलत होते. उत्सवाचे हे २४ वर्ष आहे. यावेळी महाराजानी अनेक धर्मग्रंथाचे दाखले देऊन संताचे मानवी जीवनातील महत्व विशद केले. संत ज्ञानेश्वर माऊलीनी अगदी अल्प आयुष्यात ज्ञानेश्वरीसारखा महानग्रंथ आपत्या दिला. तीच ग्रंथसंपदा आज मानवाचा उत्कर्ष करत आहे. आजचे हे उत्सव त्याच त्यागाचे प्रतिक आहेत असे विचार त्यांनी मांडले
यावेळी विष्णु महाराज दुकळे, हरिभाऊ महाराज अकोलकर, भाऊसाहेब महाराज शेकडे, महेश महाराज शेळके, अविनाश महाराज लोखंडे, भाऊसाहेब महाराज फटांगरे, शेवगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक भगवान आढाव, माजी सरपंच रामनाथ आढाव, भायगाव विकास सेवा संस्थेचे माजी चेअरमन जनार्दन लांडे, सदाशिव शेकडे, हरिचंद्र घाडगे, राष्ट्रवादीचे युवा नेते विठ्ठलराव आढाव, अशोक दुकळे, रावसाहेब आढाव, डॉ. विजय खेडकर, आण्णासाहेब जऱ्हाड, रामहारी ढोरकुले, मुरलीधर दुकळे, सखाराम लोखंडे, माणिक शेकडे, श्रीराम शेकडे, घनश्याम पालवे, पंढरीनाथ सांगळे, संतोष आढाव, अशोक देशपांडे, शिवाजी लांडे, अभिजित आढाव, पांडुरंग लटपटे, विठल रमेश आढाव, किसन शेकडे, एकनाथ घुले, पत्रकार शहाराम आगळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. किर्तनानंतर शिवाजी उत्तम शिंदे, अशोक बाबुराव गांवडे, कडुबाळ पंढरीनाथ शेकडे, चंद्रभान सुर्यभान शेकडे, यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आला.